अखेर सुजय विखेंच्या हाती भाजपाचा झेंडा, नगरमधून लढण्याचा पक्का इरादा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 01:32 PM2019-03-12T13:32:23+5:302019-03-12T14:14:24+5:30
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
मुंबई- काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी सुजय विखे-पाटलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. सुजय विखे-पाटलांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. अहमदनगरच्या विखे-पाटलांची नवी पिढी आता भाजपात गेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे-पाटलांच्या भाजपा प्रवेशानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
अहमदनगरमध्ये भाजपाचा उमेदवार निवडून येईल. अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांचे मी विशेष आभार मानतो, अहमदनगरमध्ये भाजपा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सुजय विखे-पाटलांनी सांगितलं आहे. आई-वडिलांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घ्यावा लागल्याची खंत आहे, असंही सुजय विखे-पाटील म्हणाले आहेत. सुजय विखे-पाटलांच्या या पक्ष प्रवेशादरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे, बबनराव पाचपुते आदी नेते उपस्थित होते.
Sujay Vikhe Patil:I've taken this decision against my father’s wishes. I don’t know how much my parents will support this decision, but I'll try my best to make my family proud by working under the guidance of BJP. CM & other BJP MLAs were supportive & helped me take the decision pic.twitter.com/7g0NGAAAnV
— ANI (@ANI) March 12, 2019
गेल्या अनेक दिवसांपासून सुजय विखे-पाटील हे भाजपाच्या संपर्कात होते. सुजय विखे-पाटील यांना पक्षात घेण्यास भाजपाच्या काही आमदारांनी विरोध दर्शवला होता. परंतु मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांनी त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला.
#Maharashtra: Sujay Vikhe Patil joins BJP in presence of Chief Minister Devendra Fadnavis. He is son of Radhakrishna Vikhe Patil, senior Congress leader and Leader of Opposition in Maharashtra Assembly. pic.twitter.com/6Cr4eez99R
— ANI (@ANI) March 12, 2019
तत्पूर्वी सुजय विखे-पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीने नगरची जागा सोडावी, अशी मागणी होत होती. राष्ट्रवादीने जागा न सोडल्यास थेट भाजपातून सुजय यांनी निवडणूक लढवावी, अशी भूमिका स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्याच अनुषंगानं सुजय विखे-पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.