Join us

भाजपाला विजयाची खात्री; 'मोदी' तयार करताहेत मिठाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 3:10 PM

'मोदी' मिठाई तयार करण्यात व्यस्त

मुंबई: लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यास अद्याप दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मात्र विविध वृत्तवाहिन्यांच्या सर्वेक्षणांमधून पुन्हा एकदा भाजपाला सत्ता मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. मुंबईतील भाजपाच्या कार्यालयांनी 23 मेसाठी मिठाई ऑर्डर केली आहे. बोरिवलीतील एका दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून कर्मचारी लाडू वळत आहेत. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात गोपाळ शेट्टींसमोर काँग्रेसच्या उर्मिला मांतोडकर यांचं आव्हान आहे. गोपाळ शेट्टींनी 23 मेसाठी जवळपास 1500 किलो मिठाई मागवल्याची माहिती एका दुकानदारानं दिली. त्यामुळे सध्या कर्मचारी मिठाई तयार करण्यात व्यस्त आहेत. हे कर्मचारी मोदींचा मुखवटा घालून मिठाई तयार करत आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोल्समधून भाजपाला सत्ता मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपामध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर विरोधकांच्या गोटात अस्वस्थता आहे. सध्या विरोधक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. भाजपाला मोठा फटका बसल्यास त्या परिस्थितीचा फायदा घेण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. त्यासाठी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. आज दिल्लीत 19 विरोधी पक्षांची बैठक सुरू आहे.  

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९नरेंद्र मोदीभाजपाकाँग्रेसगोपाळ शेट्टीउर्मिला मातोंडकर