Join us

पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 7:19 AM

गोयल यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्याकडे व्यावसायिक गाळे अथवा शेतजमीनही नाही. बरीचशी गुंतवणूक बँकेतील ठेवी आणि शेअर्सच्या स्वरुपात आहे .

मुंबई : महायुतीचे उत्तर मुंबईतील उमेदवार आणि भाजप नेते पीयूष गोयल यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती सुमारे ११० कोटी असल्याचे जाहीर केले आहे. मे, २०२२मध्ये राज्यसभेसाठी अर्ज दाखल करताना जाहीर केलेल्या १००.३३ कोटी मालमत्तेच्या तुलनेत त्यात १०.६१ कोटी वाढ झाली आहे. गोयल यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्याकडे व्यावसायिक गाळे अथवा शेतजमीनही नाही. बरीचशी गुंतवणूक बँकेतील ठेवी आणि शेअर्सच्या स्वरुपात आहे .

मे, २०२२ मध्ये राज्यसभेसाठी जाहीर केलेली मालमत्ता

एकूण - १००,३३,५७,७६७

पती-पत्नीकडील जंगम मालमत्ता ७९.७४ कोटी पती-पत्नीकडील स्थावर मालमत्ता २०.५९ कोटीपती-पत्नीने घेतलेले कर्ज १४.२८ कोटी• पीयूष गोयल शिक्षण बी. कॉम., एलएल.बी., सी. ए.मे, २०२४ मध्ये लोकसभेसाठी जाहीर केलेली मालमत्ताएकूण - ११०,९५,१४,४४७पती-पत्नीकडील जंगम मालमत्ता ८९.८६ कोटी • पती-पत्नीकडील स्थावर मालमत्ता २७.६० कोटी• पती-पत्नीने घेतलेले कर्ज १४.२२ कोटी

२०२४ मध्ये जाहीर केलेल्या संपत्तीचे विवरण 

वाहने - टोयोटा करोला अल्टिस, दोन टोयोटा कॅमरी सदनिका - मुंबईत दोन, पुणे आणि दिल्लीत प्रत्येक एक सदनिका. शिवाय वारसाहक्काने आलेली मालमत्तासोने-चांदी इत्यादी -साडेसात किलो सोने, साडेतीन किलो चांदी, साधारण ९०० कॅरेटचे हिरे, तीन घड्याळे (एकत्रित किंमत : ७.२० कोटी)

टॅग्स :पीयुष गोयललोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४