अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 07:21 AM2024-04-30T07:21:33+5:302024-04-30T07:25:30+5:30
मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत एक कोटी चार लाखांनी वाढ झाली आहे.
मुंबई : मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत एक कोटी चार लाखांनी वाढ झाली आहे. त्यांनी सोमवारी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात चल आणि अचल संपत्तीचा उल्लेख केला आहे.
२०१९ मधील संपत्ती विवरण
चल संपत्ती : १,०१,९१,३५४
अचल संपत्ती : ३१,१२,०००
वाहन : होंडा सिटी कार
सोने : १९३ ग्रॅम सोने (५,२८,०००)
पत्नी अनुया सावंत
चल संपत्ती : १,३८,९०,२२३
अचल संपत्ती : काहीच नाही
सोने : ४६३ ग्रॅम सोने (१२,६५,००० )
२०२४ मधील संपत्ती विवरण
चल संपत्ती : २,१३,१९,३२२
अचल संपत्ती : ८०,१२,०००
वाहन : होंडा सिटी कार
सोने : २५१ ग्रॅम सोने (१७,०१,४९६ )
चांदी : ३ किलो (२, ४६, ६५६ )
पत्नी अनुया सावंत
चल संपत्ती : २,२६,६५,८६९
अचल संपत्ती : काहीच नाही
सोने : ५०९ ग्रॅम सोने (३४,६१,००० )
चांदी : ८ किलो (६,७०,९९४ )
अवघे २०० चौरस फुटांचे घर
अरविंद सावंत यांनी उमेदवारी अर्जात आपल्याकडे २०० चौरस फुटांचे घर असल्याचा उल्लेख केला असून, शिवडीतील मिठीबाई इमारतीचा पत्ता नमूद केला आहे.
त्यांच्या चल संपत्तीत पाच वर्षांत एक कोटी ११ लाखांनी वाढ झाली. तर, अचल संपत्तीत ४९ लाखांनी वाढ झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलिसांत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल आहे.