भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 04:54 AM2024-05-03T04:54:14+5:302024-05-03T04:55:39+5:30
मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेल्या पाटील यांच्या जंगम मालमत्तेत २००९ पासून साडेतीन कोटींची वाढ झाली आहे.
मुंबई : मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील यांनी गुरुवारी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मालमत्तेचे विवरणपत्र सादर केले. मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेल्या पाटील यांच्या जंगम मालमत्तेत २००९ पासून साडेतीन कोटींची वाढ झाली आहे, तर स्थावर मालमत्तेत सहा कोटी ४१ लाखांची वाढ झाली आहे. पाटील यांच्याकडे मर्सिडीझ बेन्झ आणि बीएमडब्ल्यू या दोन लक्झरी कार आहेत.
भूषण पाटील यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर कोणत्याही प्रकारचे बँकेचे कर्ज नाही. मात्र, खासगी संस्था आणि व्यक्तींचे पाटील यांच्यावर ४ कोटी १८ लाख ३३ हजाराचे तर त्यांच्या पत्नीवर १ कोटी ६६ लाख ४६ हजारांचे कर्ज आहे.
पाटील यांच्या मालमत्तेचे विवरण
२००९ विधानसभा २०२४ लोकसभा
जंगम मालमत्ता २४,१७, ९१० ३, ८१, १७, ४५६
स्थावर मालमत्ता ९५,३५,००० ७, ३६, ७९, ०४०
कर्ज ० ०
दागिने १,८३,००० ३१,०६, ०३८
रोकड ५७५००- १, ०६, ७५१
गाड्या - फोर्ड एन्डेव्हर : १२,२०,४०० मर्सिडीझ बेन्झ : ५५,३१,७६१ तवेरा : ६,५६,२०० बीएमडब्ल्यू : १,१२,५०,०००