राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 07:08 AM2024-04-28T07:08:20+5:302024-04-28T07:08:31+5:30
उत्तर मुंबईतून गेल्या वेळी साडेचार लाखांहून अधिक मतांनी विजयी झालेले गोपाळ शेड गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापून केंद्रीय मंत्री - पीयूष गोयल यांना संधी देण्यात आली.
मुंबई: भाजपने २०१९ मध्ये विजयी झालेल्या आपल्या २३ खासदारांपैकी सात जणांची तिकिटे कापली आहेत. आता ज्या 2 जागांवर महायुतीचे उमेदवार जाहीर -होण्याचे बाकी आहेत तिथे भाजपचे - खासदार नाहीत. मुंबईतील तिन्ही विद्यमान - खासदारांना पक्षाने घरी बसविले.
उत्तर मुंबईतून गेल्या वेळी साडेचार लाखांहून अधिक मतांनी विजयी झालेले गोपाळ शेड गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापून केंद्रीय मंत्री - पीयूष गोयल यांना संधी देण्यात आली. उत्तर- पूर्वचे खासदार मनोज कोटक यांच्याऐवजी आ. मिहिर कोटेचा यांना भाजपने मैदानात उतरविले. उत्तर-मध्य मुंबईत पूनम महाजन यांच्याऐवजी अॅड. उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरविण्यात आले.
या शिवाय, जयसिद्धेश्वर स्वामी (सोलापूर), प्रीतम मुंडे (बीड), संजय धोत्रे (अकोला), उन्मेष पाटील (जळगाव) यांचे तिकीट आधीच कापण्यात आले आहे. प्रीतम यांच्याऐवजी त्यांच्या भगिनी पंकजा, तर संजय धोत्रेऐवजी त्यांचे पुत्र अनुप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.