Join us

Lok Sabha Election 2024 : राज्यात खंबीर नेतृत्व नसल्यानं पक्षाला मरगळ; अशोक चव्हाणांनी काँग्रेसवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 7:37 PM

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीतील जागावाटपावरुन भाजपाने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर आज सुटला आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी आज राज्यातील ४८ उमेदवारांची घोषणा केली. यात ठाकर गटाला २१ जागा, काँग्रेसला १७ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला १० जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, आता महाविकास आघाडीतील जागावाटपावरुन भाजपानेकाँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काही दिवसापूर्वीच काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेतृत्वार टीका केली. 

माघार न घेण्यासाठी आलेले फोन विजय शिवतारेंनी मला दाखवले; अजित पवारांचा बारामतीत गौप्यस्फोट

"जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने आहे, सगळ्याच नेत्यांना राज्यभर, देशभर फिरावं लागतं. देशातील निवडणुकीत मोदींविरोधात कोणीच नाही अशी परिस्थिती आहे. विरोधी पक्ष हतबल आहे.  काँग्रेस नेतृत्वाचा अभाव आहे. महाराष्ट्रातील जागावाटप जर पाहिल्या तर काँग्रेसला फक्त १७ जागा एवढी परिस्थिती काँग्रेसची कधी झाली नव्हती,  भिवंडी, सांगली या काँग्रेसच्या पारंपारिक जागा सोडल्या आहेत. यावरुन काँग्रेसचे राज्यातील नेतृत्व किती खंबीर नसल्याचे स्पष्ट होत आहे, असा टोला अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांच्यावर लगावला. 

"राज्यात काँग्रेसचे नेतृत्व कमकुवत आहे त्याचा हा परिणाम आहे. राजकारणात कोणी विझत नाही, राजकारणात ज्याच्या मागे जनता आहे तो दिवा पावरफुल आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले. 

ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंना प्रत्युत्तर

ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांनी भाजपावर प्रचारावरुन टीका केली होती. या टीकेल्या प्रत्युत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले,दानवेंच्या वक्तव्याला मी फारसं महत्व देत नाही. निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोप होतात. आगामी निवडणुकीच्या नाकालातून आकडेच त्यांना सांगतील की, जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने आहे. महाविकास आघाडीच्या सभा होतात तेव्हा त्यांना इंडिया आघाडीतील केंद्रातील नेत्यांची का गरज भासते, असा सवालही चव्हाण यांनी केला.  

टॅग्स :अशोक चव्हाणकाँग्रेसभाजपानाना पटोले