मनोहर कुंभेजकर, मुंबई : माझ्या वरचे सर्व आरोप खोटे असतांना मला इडीची नोटीस आली.मी मधल्या काळात इडीला सामोरे गेलो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझ्या मागे उभे राहिले नाही. एक तर जेल मध्ये जा, किंवा पक्ष सोडा हे दोनच पर्याय माझ्या समोर होते.मी टेन्शन - डिप्रेशन मध्ये होतो. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यांनी माझी बाजू समजावून घेतली, मला पाठिंबा देत न्याय दिला. अडचणीच्या काळात ज्यांनी मला मदत केली.
त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश केला अशी स्पष्ट भूमिका 27,मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी आज दुपारी त्यांच्या जोगेश्वरी लिंक रोड, श्याम तलाव जवळील निवडणूक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मांडली.
त्यावेळी मला विभागाची कामे करायची असल्याने मी प्रवेश केल्याचे सांगितले होते याची आठवण त्यांनी करून दिली. प्रसिद्धी माध्यमात आपल्या मुलाखतीचा विपर्यास केला गेला असे सुरुवातीलाच स्पष्ट करत त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली.
वायकर म्हणाले की,मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तीनदा भेटलो,एकदा ते माझ्या घरी आले. यातून मार्ग काढा,माझ्या वरचे आरोप खोटे आहेत,जे चालले आहे ते चुकीचे आहे असे आपण पंतप्रधान व गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून सांगा असे मी सांगितले होते.यावर मी काही करू शकत नाही,तुला फेस करावे लागेल असे त्यांनी सांगितले. यावेळी माझ्या मागे पक्षप्रमुखांनी उभे राहिले पाहिजे होते असे वायकर यांनी स्पष्ट केले.
मला या मतदार संघातून निवडून यायचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान करण्यासाठी मी निवडणूक लढवत असल्याचे वायकर यांनी स्पष्ट केले.