Jayant Patil ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान, काल महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात सभा झाला. या सभेत ठाकरे यांनी पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तर पुण्यातील सभेत "जर मुस्लिम समाजातील मौलवी फतवा काढत असतील तर मी देखील माझ्या हिंदू समजातील लोकांना फतवा काढतो की, महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणा, अस राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्याला आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जुना व्हिडीओ दाखवत प्रत्युत्तर दिले आहे.
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
काल महाविकास आघाडीची भिवंडी येथे सभा झाली. या सभेत जयंत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला."कुठेतर सांगितलं की मुस्लिम समाजाचा फतवा निघाला आहे. म्हणून मी आता हिंदूंचा फतवा काढतो. हिंदूंची जबाबदारी तुम्हाला कुणी दिली? हिंदू तुमच्या ताब्यात कोणी दिले? , असा सवाल जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना केला. टोकाच्या भाषणात हेच आमचे कौतुक करत होते.
मोदींना प्रचंड विरोध ते करायचे असं सांगत जयंत पाटील यांनी भर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओत फडणवीस राज ठाकरे यांच्यावर केली आहे. "पहिले तर तुम्हाला सांगतो एखादा व्यक्ती क्रिकेटमधून रिटायर्ड झाल्यानंतर तो काय करतो, तो कॉमेंट्री करतो. अर्थात तो मानधन घेऊन करतो, हे करतात का नाही माहित नाही, तशी राज ठाकरे यांची आता अवस्था आहे ते खेळत नाहीत. ते रिटायर्ड आहेत.पण ठीक आहे आता ज्याची सुपारी आपण घेतली ती वाजवावी लागेल" , असं या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर जयंत पाटील म्हणाले, त्यामुळे काही मनावर घेऊ नका, फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे मी काही बोललेलो नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
राज ठाकरे म्हणाले, "आज कोण-कुणावर बोलतोय आणि कोण कुणावर आरोप करतंय, सगळं सोडून द्या. अरे, तुम्ही म्हणताना माझे वडील चोरले, माझे वडील चोरले, त्या वडीलांबद्दल एवढं प्रेम आहे, मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे, एकच... मी खरे तर एकदाच बोललो होतो मागच्या सभांमध्ये, लावा रे तो व्हिडीओ, तेव्हा पासून सगळ्यांनी तेचं सुरु केलं. पण आता सांगतोय, लावा रे तो व्हिडीओ...," असे म्हणत राज यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा एक व्हिडीओ दाखवत, उद्धव ठाकरेंवर टीका केली.