Join us  

"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 11:12 AM

Sanjay Raut : काल लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान पार पडले. ४ जून रोजी निकाल समोर येणार आहेत, याआधी काल एक्झिट पोल आले.

Sanjay Raut ( Marathi News ) : काल लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान पार पडले. ४ जून रोजी निकाल समोर येणार आहेत, याआधी काल एक्झिट पोल आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन होणार असल्याचा निष्कर्ष बहुतांश एक्झिट पोलमधून काढण्यात आले आहेत. या पोलवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही एक्झिट पोलवरुन आरोप केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज

"चॅनेलने किंवा एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांनी मतदान केलेले नाही, कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत.  राजस्थानमध्ये एकूण २७ जागा आहेत आणि तिथे एका एक्झिट पोल कंपनीने भाजपाला ३३ जागा देऊन टाकल्या आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. "मला असं वाटतं की हे सगळे मिळून भाजपाला ८०० ते ९०० जागा देतील, असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपाला लगावला. 

"मोदींनी एवढा वेळ ध्यान केलं आहे, इतके कॅमेरे लावले. साधना केली, तपस्या केली त्यामुळे ३६०, ३७० म्हणजे काहीच नाही. अशा तपस्वी आणि ध्यानस्त माणसाला ८०० ते ९०० जागा मिळायलाच पाहिजेत तरच ते ध्यान मार्गी लागले असं मी म्हणेन, अशी टीकाही संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. हा एक्झिट पोल अत्यंत फ्रॉड आहे, ओपीनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षामध्ये कसे चुकीचे ठरतात. भाजपा आणि गृहमंत्रालय कशा पद्धतीने यावर प्रभाव टाकते हे सगळ्यांना माहित आहे, असंही संजय राऊत म्हणाले. 

काल एक्झिट पोलचा अंदाज आले समोर

इंडियाला २९५ पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी संध्याकाळी वर्तविला होता. पण त्यापेक्षाही कमी जागा इंडिया आघाडीला मिळतील असा अंदाज पाच एक्झिट पोलनी वर्तविला आहे. सात एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजांची सरासरी काढली तर एनडीएला सरासरी ३६१ जागा मिळतील तर इंडिया आघाडीला १४५ जागांवर समाधान मानावे लागेल असा निष्कर्ष निघतो.

भाजपला ३११ जागा तर काँग्रेसला ६३ जागा मिळतील. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला ५२ जागांवर विजय मिळाला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकांत एनडीएला ३७१ ते ४०१ जागा मिळण्याची शक्यता इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोलने व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीला १०९ ते १३९ जागा जिंकता येतील. तर जन की बात या एक्झिट पोलने एनडीला ३६२ ते ३९२ व इंडिया आघाडीला १४१ ते १६१ जागा मिळतील असे म्हटले आहे. दैनिक भास्करने केलेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला २८१ ते ३५० व इंडिया आघाडीला १४५ ते २०१ जागा मिळतील असे म्हटले आहे.

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाभाजपालोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४