Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपाविरोधात इंडिया आघाडी केली असून राज्यात महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी लढत होणार आहे. महायुतीमध्ये जागावाटपावरुन बैठकांचे सत्र सुरू आहे. तर, शिंदे गटातील काही उमेदवार बदलण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.
शिंदे गटाने लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत आठ उमेदवारांची नाव जाहीर केले आहेत, यात राहुल शेवाळे – मुंबई दक्षिण मध्य, संजय मंडलीक – कोल्हापूर, सदाशिव लोखंडे – शिर्डी, प्रतापराव जाधव – बुलढाणा, हेमंत पाटील – हिंगोली, श्रीरंग बारणे – मावळ, राजू पारवे – रामटेक, धैर्यशिल माने – हातकणंगले या उमेदवारांचा समावेश आहे.
आमदार कडू-राणांमध्ये पुन्हा जुंपली; थेट अमेरिकेच्या 'डोनाल्ड ट्रम्प' यांच्याशीच तुलना
दरम्यान, आता दोन दिवसात शिंदे गट आणखी एक यादी जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. काही जागांवर भाजपाने उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. आज दिवसभर मुख्यमंत्री निवासस्थानी 'वर्षा' बंगल्यावर बैठकांचे सत्र सुरू आहे. आज तीन जागांसाठी बैठका सुरू आहेत. नाशिकसाठी हेमंत गोडसे, हिंगोलीसाठी हेमंत पाटीस तर यवतमाळ वाशिमसाठी भावना गवळी या जागांसाठी बैठका सुरू आहेत.
या तीन मतदारसंघासाठी बैठका
नाशिक, हिंगोली, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघातील उमेदवार बदला अशी मागणी भाजपाने केली असल्याचे बोलले जात आहे. यावरुन आता बैठकांचे सत्र सुरू आहे.
दरम्यान, आता यवतमाळ-वाशिम लोकसभासाठी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. भावना गवळी यांच्या उमेदवारीवर अजूनही टांगती तलवार आहे. गवळींच्या जागेवर दुसरा उमेदवार देण्यासाठी भाजपाने शिंदे गटावर दबाव आणल्याचे बोलले जात आहे.
शिंदे गटातील बडे नेते वर्षा बंगल्यावर
वर्षा बंगल्यावर आमदार सुहास कांदे, भाऊ चौधरी यांच्यासह नाशिकचे २० पदाधिकारी आले आहेत. मंत्री दादा भुसे यवतमाळचा दौरा रद्द करुन उशीरा वर्षा बंगल्यावर दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे.
"नाशिकची जागा पारंपारिकरित्या शिवसेनेकडे असताना ही जागा शिवसेनेकडेच राहणार आहे. पहिलं प्राधान्य शिवसेनेला राहणार आहे. ही चर्चा राज्यस्तरीय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जागेसाठी आग्रही आहेत, अशी प्रतिक्रिया नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.