'संजय निरुपम, रवींद्र वायकर सारख्यांना पाठिंबा गृहीत धरू नका'; मनसेचा एकनाथ शिंदेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 05:16 PM2024-04-23T17:16:13+5:302024-04-23T17:20:23+5:30
MNS : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचारसभा सुरू आहेत. पण, महायुतीने अजूनही मुंबईतील उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
MNS ( Marathi News ) :मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. गुढी पाडवा मेळाव्यानंतर राज्यातील मनसेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात सामील झाले आहेत. तर दुसरीकडे मनसे नेत्यांनी महायुतीच्या उमेदवारांवरुन नाराजी व्यक्त केल्याचे दिसत आहे. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुंबईतील उमेदवारांना विरोध केला आहे, याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचारसभा सुरू आहेत. पण, महायुतीने अजूनही मुंबईतील उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
भाऊ म्हणून मी पार्थच्या पराभवाचा बदला घेणार; मावळमध्ये रोहित पवारांनी अजितदादांना डिवचलं!
शालिनी ठाकरेंचं ट्विट काय?
"मनसेला 'धनुष्य बाण'चिन्हावर लढायला सांगणार्यावर दुसर्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे.
लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे, असंही आपल्या पोस्टमध्ये ठाकरे यांनी म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024)
"इकडून तिकडून पाला पाचोळ्या सारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये, असा इशाराही शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
मनसेला 'धनुष्य बाण' चिन्हावर लढायला सांगणार्यावर दुसर्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे.
— Shalini Thackeray (@ThakareShalini) April 23, 2024
लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे.
इकडून तिकडून पाला पाचोळ्या सारखा उडत आलेला…
उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रविंद्र वायकरांच्या नावावर शिक्कामोर्तब?
ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे गट त्यांच्याविरोधात गजानन कीर्तिकर यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू होती. पण, या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रविंद्र वायकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे. या आधी या लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून संजय निरुपम यांच्या नावाचीही चर्चा झाली होती.
मनसेचा ठाकरे गटाला इशारा
राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर आता मनसेमहायुतीसोबत प्रचार, बैठका यांवर भर देत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे कुठे प्रचारसभा घेणार, मनसैनिक महायुतीच्या प्रचारात कसे सहभागी होणार, याची रणनीती आखली जात आहे. अशातच ठाकरे गटाने केलेल्या टीकेवरून आता मनसेने थेट शब्दांत इशारा दिला आहे. (Lok Sabha Election 2024)
राज ठाकरे म्हणजे फूस झालेली लवंगी फटाके आहेत. त्यामुळे कोकणात काहीही फरक पडणार नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली होती. या टीकेला मनसेकडून जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत राऊतांसह ठाकरे गटाला इशारा दिला असून, राज ठाकरे यांच्यावरील टीका सहन केली जाणार नाही, असे म्हटले आहे.