Join us

राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 9:31 AM

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यासाठी मुंबईतील जागांसाठी मतदान होणार आहे.

Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान उद्या २० मे रोजी होणार आहे.  या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांनी 'लोकसत्ता' या वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये खासदार पवार यांनी मोठे खुलासे केले. 

गेल्या काही दिवसापासून खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. '२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेत सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री करता आला असता पण पक्ष नेतृत्वाने मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिले', असा आरोप अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांच्यावर केला होता. या आरोपावर आता पवार यांनी मोठा खुलासा केली आहे. 

"२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता, असं प्रत्युत्तर खासदार शरद पवार यांनी अजित पवार यांना दिले. त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्षात फूट पडली असती, असा गौप्यस्फोटही शरद पवार यांनी केला.

" २००४ मध्ये मुख्यमंत्रि‍पदाबाबत निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविण्याचा प्रश्न नव्हता. कारण ते फारच नवखे होते. मुख्यमंत्रि‍पदासाठी कोणी योग्य नेता आमच्याकडे नव्हता. तेव्हा छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती.त्यामुळे अधिकची मंत्रि‍पदे आणि खाती मिळवून मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याचा निर्णयावरआम्ही आलो, असंही खासदार शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४