Join us

'तो इतिहास श्रीकृष्णाच्या कुटुंबाचा नव्हता, काकींना चुकीची माहिती दिली असावी; रोहित पवारांचे सुनेत्रा पवारांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 10:56 AM

Rohit Pawar : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे, दोन्ही बाजूंनी टीका सुरू आहेत.

 Rohit Pawar ( Marathi News ) :  बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे अशीच लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे, दोन्ही बाजूंनी टीका सुरू आहेत. काल सुनेत्रा पवार यांची एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे, या फेसबुक पोस्टमध्ये अजित पवार यांची तुलना श्रीकृष्णाशी केली आहे. या टीकेला आता 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

लोकसभा 2024: राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता; आज-उद्या निर्णय होणार!

"श्रीकृष्णा हे कायम सत्तेच्या बाजूने होते, सत्य हेच त्यांच्यासाठी महत्वाचं होतं. लोक त्यांच्यासाठी महत्वाचे होते. ते शेवटपर्यंत सत्याच्या बाजूने होते आणि विजय हा शेवटी सत्याचा झाला आणि इथे लढाई असत्य विरुद्ध सत्याची आहे. आज साहेबांना आणि पुरोगामी विचारांना सोडून गेले आहेत, त्यांच्यामध्ये दादासुद्धा येतात. त्यामुळे विचार त्यांनी बदलला आहे, त्यांची चूक नसावी सल्लागाराने चुकीची माहिती दिल्यामुळे त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला असावा, असं प्रत्युत्तर आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना दिले आहे. 

सुनेत्रा पवारांची फेसबुक पोस्ट काय आहे?

सारोळ्यात सगळेच एकवटले..!

अवघ्या काही दिवसात आज पुन्हा सहाव्यांदा भोर वेल्हे मुळशी विधानसभा मतदार संघात सदिच्छा भेटीसाठी दखल झाले.

सारोळा येथून या भेटींचा प्रारंभ करताना सर्वप्रथम वंदन केले ते छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यानंतर झालेल्या सदिच्छा भेटीत महायुतीतील सर्वच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले.

महायुतीतील इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विकासकामाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पक्षीय राजकारणा पलिकडचे, व्यापक हिताचे अनुभव सांगितले. जनतेला २४ तास भेटणारे दादा आहेत, कधीही फोन केला तर त्याला प्रतिसाद देणारे दादा आहेत, आपण सारे जण दादांचे भाऊ आहोत, श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच. अशा अनेक भावना सर्वांकडून पोटतिडकीने व्यक्त होत होत्या. त्या भावनातून लोकसभा निवडणुकीतील विजयाचा निर्धार व्यक्त केला.

सुनेत्रा पवार यांची ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.  

टॅग्स :रोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेससुनेत्रा पवारलोकसभा