राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 06:59 AM2024-04-30T06:59:55+5:302024-04-30T07:00:16+5:30
शेवाळे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद केले होते. मात्र, मागील पाच वर्षांत त्यांच्याकडील मालमत्तांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
मुंबई : शिंदेसेनेचे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत तब्बल सात कोटी १८ लाख रुपयांची वाढ झाली आहे. शेवाळे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद केले होते. मात्र, मागील पाच वर्षांत त्यांच्याकडील मालमत्तांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
शेवाळे यांच्या मालमत्तेचा तपशील असा...
२०१८ राज्यसभा २०२४ लोकसभा अचल मालमत्ता - ७,१८,००,०००
चल मालमत्ता १,०१,३७,०४७ ६२,०४,६६९
कर्ज ७७,२९,९५४ १,९५,००,०००
दागिने ३,००,००० ७,४५,९००
बँकांतील ठेवी २,३९,९४३ १३,२१,८२१
बाँड / शेअर ४३,७०,००० ११,४४,९९९
घर २०२४ : जमीन - तिकोणे, ता. मावळ, जि. पुणे येथे ६६ गुंठे जमीन, वाडापुरी, ता. इंदापूर येथे ५३.३३ गुंठा जमीन. पती पत्नीच्या नावे ९,३३३ चौरस फूट जागा मानखुर्द येथे. बाजारमूल्य चार कोटी रुप. देवनार येथे व्यावसायिक इमारतीत जागा. एका जागेचे बांधकाम क्षेत्र ८७४ चौरस फूट, तर दुसऱ्या जागेचे बांधकाम क्षेत्र १,५५५ चौरस फूट. दोन्ही जागांचे बाजारमूल्य ३ कोटी ९५ लाख. ४०%, तर मुलीची २०% मालकी आहे. किंमत १५ लाख.
पत्नी - कामिनी शेवाळे
२०२४ लोकसभा
अचल मालमत्ता ६०,००,००० २,७५,००,०००
चल मालमत्ता २१,४४,३१६ २,६१,२०,१५४
कर्ज ४९,००० २,४०,३२,६०८
दागिने १५,००,००० ४०,८९,६६८
घर २०१८ : पत्नी - घोडपदेव येथे १०० चौरस फुटांची जागा - तत्कालीन किंमत - ६० लाख
२०२४ : घोडपदेव येथे २७५ चौरस फुटांचे घर - तत्कालीन किंमत - ७५ लाख
राहुल शेवाळे यांच्याकडे इनोव्हा क्रेस्टा गाडी आहे, तर शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांच्याकडे मारुती स्विफ्ट झेडएक्सआय सिरीजमधील गाडी आहे.
कोणतेही प्रलंबित गुन्हे नाहीत.