Join us

उत्तर-पश्चिम मतदार संघातून शिंदे सेनेचे रवींद्र वायकर यांनी सुरू केली मतदार संघाची जुळवाजुळव

By मनोहर कुंभेजकर | Published: April 18, 2024 7:13 PM

lok sabha election 2024 : आधी उमेदवारीला नकार देणाऱ्या नकार देणाऱ्या वायकर यांचे मन वळवण्यात मुख्यमंत्र्यांना अखेर यश आले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे शिंदे सेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीला  हिरवा कंदील दिला असल्याने त्यांनी मतदार संघाची जुळवा जुळव करायला सुरुवात केली आहे.

आधी उमेदवारीला नकार देणाऱ्या नकार देणाऱ्या वायकर यांचे मन वळवण्यात मुख्यमंत्र्यांना अखेर यश आले. वर्षावर  मुख्यमंत्र्यां बरोबर त्यांच्या बैठका झाल्या होत्या.यावेळी त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला असून त्यांच्या नावाची लवकरच घोषणा मुख्यमंत्री करतील अशी माहिती सूत्रांनी लोकमतला दिली. 

गेल्या काही दिवसांपासून आमदार वायकर त्यांच्या जोगेश्वरी पूर्व श्याम नगर तलावा जवळील सेवालय कार्यालयात तर कधी मातोश्री क्लब मध्ये रोज महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका भेटी गाठी जोमाने सुरू झाल्या आहेत.तर इतर ठिकाणी महत्वाच्या बैठकांना सुद्धा ते जातात.कालच 8-10 मान्यवर डॉक्टरांची बैठक देखिल मातोश्रीत त्यांनी घेतली होती.येत्या दोन तीन दिवसात त्यांची शिंदे सेनेतून उमेदवारी जाहिर झाल्यावर त्यांचा प्रचार सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.

वायकर यांच्या जोगेश्वरी पूर्व येथील कार्यालयात त्यांनी अलिकडे उत्तर पश्चिम मतदार संघातील शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि माजी नगरसेवकांची बैठका घेवून मतदार संघाची चाचपडणी केली होती. चर्चे दरम्यान ते त्यांच्या उमेदवारी बद्धल बऱ्यापैकी सकारात्मक होते अशी माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.

टॅग्स :रवींद्र वायकरलोकसभा निवडणूक २०२४मुंबईएकनाथ शिंदे