Join us

वर्षा गायकवाड यांच्या संपत्तीत दुप्पट वाढ; वाहन नाही, ८० लाख पतीकडून घेतले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 10:53 AM

मंगळवारी मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार गायकवाड व त्यांचे पती राजू गोडसे यांची एकूण मालमत्ता ११ कोटी ६५ लाख ३९ हजार २५५ रुपये दाखविली आहे.

मुंबई : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आणि पक्षाच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी २०१९ साली विधानसभा निवडणूक लढविल्यानंतर गेल्या साडेचार वर्षांत त्यांच्या संपत्तीत दुप्पट वाढ झाली आहे.

मंगळवारी मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार गायकवाड व त्यांचे पती राजू गोडसे यांची एकूण मालमत्ता ११ कोटी ६५ लाख ३९ हजार २५५ रुपये दाखविली आहे. त्यात ३ कोटी ९६ लाख ९० हजार ५६९ रुपयांची जंगम मालमत्ता असून ७ कोटी ६८ लाख ४८ हजार ५६५ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

२०१९ विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ४ कोटी ८१ लाख ५३ हजार २६९ रुपयांची मालमत्ता होती. त्यावेळी पती-पत्नीच्या नावावर कोणतेही कर्ज नव्हते. मात्र, आता १ कोटी १ लाख ६० हजारांचे कर्ज आहे. यातील ८० लाख गायकवाड यांनी पतीकडून घेतले आहेत. गायकवाड व त्यांच्या पतीकडे स्वतःचे वाहन नाही.

जंगम मालमत्ता    स्थावर मालमत्ता

२०१९               काही नाही  

वर्षा गायकवाड

८४,३४,८८४

राजू गोडसे                             राजू गोडसे

१,४७,६०,९९८                     २,९३,१०,०२०

राजू गोडसे                              राजू गोडसे२,१०,८२,५४८                       ४,७५,३८,३३६

कर्ज २०१९                                                                                      

वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीवर कुठलेही कर्ज नाही

२०२४ -वर्षा गायकवाड८० लाखराजू गोडसे : २१.६० लाख

टॅग्स :वर्षा गायकवाडकाँग्रेसलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४