Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीची महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी झाले. दरम्यान, आता दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वीच ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे सचिव आहेत आणि मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यकही होते. आता त्यांना महायुतीकडून ऑफर आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यावर शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी अपडेट दिली आहे.
'मोदी-शाहांवर कारवाई का नाही', उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली
" उबाठा गटाचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेकडे येण्यासाठी उत्सुक आहेत. नेते आमदारही येण्यासाठी इच्छुक आहेत. आता इंनकमिंग सुरू असताना मिलिंद नार्वेकर यांचं नाव कळलं . ते येत असतील तर त्यांचं स्वागत आहे मात्र अधिकृत संपर्क झालेला नाही आम्ही संर्पक केला नाही, असंही शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे म्हणाले.
सीएम शिंदे उद्धव ठाकरेंना धक्का देणार?
मिलिंद नार्वेकर यांना महायुतीकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ऑफर दिल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेने ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून निवडणूक रिंगणात आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ही जागा मिळाली आहे. याशिवाय भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिवसेनेचे यशवंत जाधव लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
मिलिंद नार्वेकर हे बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत शिवसेनेसाठी काम करत आहेत. शिवसेनेवर जेव्हा-जेव्हा संकट आले तेव्हा नार्वेकरांनी महत्त्वाची भूमिका बजावत पक्षाला पूर्ण पाठिंबा दिल्याचे बोलले जाते.मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेना ठाकरे गट सोडल्यास निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसू शकतो.