मुंबई : महायुतीच्या दक्षिण मुंबईतील उमेदवार यामिनी जाधव यांच्या स्थावर मालमत्तेत पाच वर्षात दुपटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जाधव यांनी २०१९ साली भायखळा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्या आमदार म्हणून निवडून आल्या होता. आता त्यांना महायुतीने लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. २०१९ सालच्या तुलनेत त्यांची जंगम मालमत्ता मात्र २०२४ साली कमी झाल्याचे दिसून आले आहे. जाधव यांची आयकर विभागाकडून चौकशी सुरू असून त्यात २.८८ कोटी रुपयांची वसुली असल्याचा दावा करण्यात आला असून त्याविरोधात त्या अपिलात गेल्या आहेत. जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांच्या संपत्तीचा तपशील पुढीलप्रमाणे.
२०१९ जंगम मालमत्ता
यामिनी : २,७४,२०,०९६
यशवंत : १,७२,६७,४९८
स्थावर मालमत्ता
यामिनी : ३,४९,५०,०००
यशवंत : १,९४,७५,०००
कर्ज
यामिनी : २,६५,०२,५५२
यशवंत : ४९,९०,०००
२०२४ जंगम मालमत्ता
यामिनी : १,४८,६९,५८९ रुपये मूल्य
यशवंत : ६९,४३,७२६ रुपये मूल्य
स्थावर मालमत्ता
यामिनी : ४,९६,८८,०००
वारसाहक्काने आणि मुलाने भेटीखातर दिलेली :
३,३७,५७,००० रुपये मूल्य
यशवंत : २,९४,१७,६०० रुपये
शासकीय वसुली: २,८८,८३,३९८ रुपये
कर्ज : ४६,००,०००
रोख रक्कम : ४,३३,२९६
सोने : ३५,६२,५०० रुपये मूल्याचे
वाहन : नाही