लोकसभा निवडणूक आचारसंहिता ८ मार्चला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 03:38 AM2019-03-03T03:38:57+5:302019-03-03T03:40:10+5:30
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ८ मार्चपासून लागू होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता एकामागून एक निर्णय घेण्याचा सपाटा राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने लावला आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ८ मार्चपासून लागू होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता एकामागून एक निर्णय घेण्याचा सपाटा राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने लावला आहे.
५ मार्च आणि ७ मार्च रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. निवडणुकीवर नजर ठेवून आणखी काही निर्णय घेतले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काही विकास प्रकल्पांचे भूमिपूजन ५ तारखेला होईल. त्यात समृद्धी महामार्गाचाही समावेश असेल, असे सूत्रांनी सांगितले.
ग्रामपंचायतींसाठी समिती
राज्यातील सरपंचांच्या समस्या सोडविण्यात येतील आणि ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी शासनाची समिती स्थापन केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणीवस यांनी दिले. पंचायत राज विकास मंचच्या अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळासमवेत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.