कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 09:21 PM2024-06-01T21:21:34+5:302024-06-01T21:22:15+5:30
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 :निवडणुका सुरू झाल्यापासून कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू होती.
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 ( Marathi News ): लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. हातकणंगले, कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघावर सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. या मतदारसंघात चुरशीची लढत झाली आहे. दरम्यान, आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यात धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
निवडणुका सुरू झाल्यापासून या दोन्ही मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू होती.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची देशभरात चर्चा होती. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांना तर महायुतीने खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, टिव्ही नाईनच्या एक्झिट पोलनुसार, या मतदारसंघात शाहू महाराज आघाडीवर असल्याचे दाखवले आहे. ४ जून रोजी लोकसभेचे निकाल समोर येणार आहेत.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर यांना तर महायुतीने शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली होती. तर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे पण निवडणूक रिंगणात होते. या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. दरम्यान, आता टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलनुसार, ठाकरे गटाचे सत्यजित पाटी आघाडीवर असल्याचे दाखवले आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघ
सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ही जागा ठाकरे गटाला सोडली. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत ही निवडणूक अपक्ष लढवली तर भाजपाकडून संजयकाका पाटील यांनी निवडणूक लढवली. दरम्यान, आता निकालाआधी एक्झिट पोल समोर आले आहेत. टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलनुसार, सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील आघाडीवर असल्याचे दाखवण्यात आले आहे.