Vasant More : मनोज जरांगे पाटील अन् वसंत मोरेंची झाली भेट; काय ठरलं? मोरेंनी सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 05:03 PM2024-03-30T17:03:46+5:302024-03-30T17:08:37+5:30
Vasant More : वसंत मोरे पुणे लोकसभा लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी आता पाठिंबा मिळवण्यासाठी भेटी वाढवल्या आहेत.
Vasant More ( Marathi News ) : महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातून बाहेर पडल्यानंतर आता वसंत मोरे पुण्यातून लोकसभा लढवण्याची तयारी करत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेतली होती, दरम्यान, दोन दिवसापूर्वी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. वसंत मोरे पुणे लोकसभा लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी आता पाठिंबा मिळवण्यासाठी भेटी वाढवल्या आहेत. आज मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी मोरे गेले आहेत. या भेटीत काय चर्चा झाली, याबाबत वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली.
Satara Lok Sabha Election 2024 : शरद पवारांनी कॉलर उडवली, उदयनराजे भोसले म्हणाले, 'ते पवार साहेब...'
"मी आज फक्त मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. पुण्यात कशापद्धतीने मतदान आहे हे सर्व त्यांना दिले आहे. पाटील लग्नासाठी गेले आहेत, तिथून आल्यानंतर मी चर्चा करेन. मी मनसे पक्ष सोडल्यापासून मी अपक्ष उभा राहणार यावर ठाम आहे. यासाठी मी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. सकल मराठा समाजाचे काम मी सुरुवातीपासून करत होतो. सकल मराठा समाजाचा मी पाईक आहे, पाटील जी भूमिका घेणार आहेत. राज्यातील अनेक लोक इथे आले आहेत. त्यांना जी यादी दिली आहे त्यात माझंही नाव आहे, असंही वसंत मोरे म्हणाले.
वसंत मोरे म्हणाले, शेवटी ही निवडणूक आहे, यात तु करु नको असं म्हणता येत नाही. पाटील सकल मराठा समाजाचे नेतृत्व करतात, त्यांच्यापुढे प्रत्येकजण आले आहेत. मला वाटतंय की, पाटील आणि मराठा समाज माझ्या नावाच विचार शंभर टक्के करतील, असंही वसंत मोरे म्हणाले.
दोन दिवसापूर्वी वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली
धंगेकरांच्या उमेदवारीनंतर वसंत मोरे यांनी अन्य पर्यायाची चाचपणी केली. त्यात वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळावा यासाठी मोरे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. कुठल्याही परिस्थितीत मी पुणे लोकसभा लढवणारच असा चंग वसंत मोरे यांनी बांधला आहे. त्यासाठी ते पर्यायी पक्षाची चाचपणी करत आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळाली तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे तिसरा पर्याय सध्या वसंत मोरे यांच्याकडून शोधण्याचा प्रयत्न होत आहे.