महाराष्ट्रात 60 दिवसांत 1 हजार सभा, मोदींसह भाजपा नेत्यांचा प्रचाराचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 06:18 PM2019-03-29T18:18:31+5:302019-03-29T18:19:23+5:30

प्रमुख भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या सुमारे एक हजार जाहीर सभा तसेच रोड शो होणार महाराष्ट्रात घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Lok Sabha elections 2019 - BJP leaders take 1 thousand Sabha & rally in Maharashtra | महाराष्ट्रात 60 दिवसांत 1 हजार सभा, मोदींसह भाजपा नेत्यांचा प्रचाराचा धडाका

महाराष्ट्रात 60 दिवसांत 1 हजार सभा, मोदींसह भाजपा नेत्यांचा प्रचाराचा धडाका

Next

मुंबई - भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा जोरदार धडाका उडणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह प्रमुख भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या सुमारे एक हजार जाहीर सभा तसेच रोड शो होणार महाराष्ट्रात घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

केशव उपाध्ये म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा 1 एप्रिल रोजी वर्धा येथे सकाळी होणार असून त्याशिवाय अन्य लोकसभा क्षेत्रातही भाजपा-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 24 तारखेला कोल्हापूरात प्रचाराला सुरूवात केली असून त्यांच्याही 75 पेक्षाही अधिक सभा या राज्यात होतील.

तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आगामी काळात महाराष्ट्रात प्रचाराला येणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील प्रचारसभामध्ये सहभागी होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असूनही ते महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघात सभा घेणार आहेत. त्यांच्यासोबतच चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांच्याही सभा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

राज्यातील या नेत्यांशिवाय राष्ट्रीय पातळीवरील भाजपा नेते राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, सैय्यद शाहनवाज हुसेन, मुख्तार अब्बास नकवी, रमणसिंग, केशव प्रसाद मोर्य हे नेतेही राज्यातील भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत.या राष्ट्रीय नेत्यांसोबत राज्यातील अन्य नेत्यांच्या सभाही महाराष्ट्रात होणार आहेत. तसेच शहर आणि तालुका पातळीवर गिरीश महाजन, गिरीश बापट, अतुल भातखळकर, आशिष शेलार, माधव भांडारी, कांताताई नलावडे हे प्रचार सभा घेणार आहेत असे केशव उपाध्ये यांनी सांगितले. 
 

Web Title: Lok Sabha elections 2019 - BJP leaders take 1 thousand Sabha & rally in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.