अन् टीव्हीवर भाषण ऐकण्यासाठी पवारांनी चक्क बैठक थांबवली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 05:16 PM2019-03-20T17:16:11+5:302019-03-20T17:17:08+5:30

अचानक टीव्हीवर भाषण लागलं ते भाषण ऐकण्यासाठी पवारांनी बैठक थांबवली. हे भाषण नक्की कोणाचं असेल हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. 

lok Sabha Elections 2019 - Pawar stopped the meeting to listen speech on TV | अन् टीव्हीवर भाषण ऐकण्यासाठी पवारांनी चक्क बैठक थांबवली

अन् टीव्हीवर भाषण ऐकण्यासाठी पवारांनी चक्क बैठक थांबवली

Next

मुंबई - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी मुंबईत आज बैठक बोलवली होती. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँगेसची बैठक सुरू होती. मात्र अचानक टीव्हीवर भाषण लागलं ते भाषण ऐकण्यासाठी पवारांनी बैठक थांबवली. हे भाषण नक्की कोणाचं असेल हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. 

पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील गरवारे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी रणजितसिंह पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर केलेलं भाषण सर्व चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात आलं होतं आणि हेच भाषण ऐकण्यासाठी शरद पवारांनी बैठक मध्येच थांबवली, थेट प्रक्षेपण बघताना शरद पवारांनी रणजितसिंह मोहिते-पाटलांनी केलेलं संपूर्ण भाषण ऐकलं. गेल्या 20 वर्ष राष्ट्रवादीत विविधं पदं उपभोगलेले रणजितसिंह आपल्या भाषणात भाजपाचे कौतुक करताना पवार ऐकत होते. भाषण संपल्यावर पुन्हा माढा मतदारसंघाच्या बैठकीला सुरुवात झाली.

गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची बातमी सर्वच माध्यमांनी उचलून धरली होती. त्याचं कारण ही तसेच होते. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने खेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रतिष्ठीत मोहिते पाटील घराण्यातील तरुण नेतृत्त्वाला संधी देत भाजपाने शरद पवारांना डिवचलं.  

या भाषणात बोलताना रणजितसिंह मोहिते पाटील बोलले की, मागील 5 वर्षात मतदारसंघात जी विकासकामं करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वामुळे ते शक्य झाले. विरोधी पक्षात असतानाही आमच्या मतदारसंघात कामं कशी होतात अशी टीकाही आमच्यावर होत होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली गेल्या पाच वर्षात राज्य प्रगतीपथावर आलं. सर्व पक्ष, गटतट बाजूला ठेवत सर्वांची कामे केली. माढा, सोलापूरमधील सिंचन प्रश्न, रेल्वेचे प्रश्न, पासपोर्ट कार्यालयाचे प्रश्नही सोडवले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे विविध रस्त्यांची कामे झाली. परंतु गेल्या पाच वर्षात या प्रकल्पाला गती मिळत आहे, अशी माहिती रणजितसिंह मोहिते पाटलांनी दिली.

Web Title: lok Sabha Elections 2019 - Pawar stopped the meeting to listen speech on TV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.