Lok Sabha Elections 2024: राज्यातील पाच मतदारसंघांत आज मतदान, सुरक्षा कडक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 05:41 AM2024-04-19T05:41:47+5:302024-04-19T05:42:21+5:30
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क असून त्यांच्या मदतीला हेलिकॉप्टर देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघांत शुक्रवारी मतदान होत आहे. हे मतदान शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावे यासाठी पाचही मतदारसंघात केंद्रीय दल तसेच अन्य राज्यांचे दल मिळून १२४ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क असून त्यांच्या मदतीला हेलिकॉप्टर देण्यात आले आहे.
नक्षली कारवायांचा धोका लक्षात घेऊन गडचिरोली, चिमूर लोकसभा मतदारसंघातील आमगाव,आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी तसेच भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील अर्जुनी मोरगाव अशा पाच विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत मतदान पार पडेल. इतर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदान पार पडेल.
- नागपूर - २२.२३लाख
- रामटेक - २०.४९ लाख
- भंडारा गोंदिया - १८.२७ लाख
- गडचिरोली-चिमूर - १६.१७ लाख
- चंद्रपूर - १८.३७ लाख