Lok Sabha Result 2024: मुंबईत महायुती ४ तर मविआ २ जागांवर आघाडीवर; कोणत्या मतदार संघात कोण पुढे?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 10:09 AM2024-06-04T10:09:50+5:302024-06-04T10:14:38+5:30

Mumbai Lok sabha Result: मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांचे सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यात सहापैकी ४ जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

Lok Sabha Result 2024 In Mumbai Mahayuti leads in 4 seats and Mva leads in 2 seats | Lok Sabha Result 2024: मुंबईत महायुती ४ तर मविआ २ जागांवर आघाडीवर; कोणत्या मतदार संघात कोण पुढे?

Lok Sabha Result 2024: मुंबईत महायुती ४ तर मविआ २ जागांवर आघाडीवर; कोणत्या मतदार संघात कोण पुढे?

मुंबई-

Mumbai Lok Sabha Result 2024: मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांचे सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यात सहापैकी ४ जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीवर आहे. मुंबई उत्तरमध्ये भाजपाचे पीयूष गोयल (Piyush Goyal), उत्तर-मध्य मतदार संघात उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam), दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव (Yamini Jadhav) आणि दक्षिण-मध्य मुंबईतून शिवसेनेचे राहुल शेवाळे (Rahul Shewale) आघाडीवर आहेत. 

मविआचे दोन उमेदवार सध्या मुंबईत आघाडीवर आहेत. यात उत्तर-पूर्व मतदार संघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील (Sanjay dina patil) आणि उत्तर-पश्चिम मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) आघाडीवर आहेत. त्यामुळे सध्याच्या आकडेवारीनुसार मुंबईत महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. अर्थात हे सुरुवातीचे कल आहेत आणि एकंदर मुंबईतील सहाही जागांवरील लढत अटीतटीची पाहायला मिळत आहे. क्षणाक्षणाला मतमोजणीचे कल बदलताना दिसत आहेत.

कोणत्या मतदार संघात कुणाची किती आघाडी?
दक्षिण मध्य: राहुल शेवाळे ६८८१ आघाडी (शिवसेना-शिंदे गट)
दक्षिण मुंबई: यामिनी जाधव ११७२ आघाडी (शिवसेना-शिंदे गट)
उत्तर-मध्य: उज्ज्वल निकम ५२२४ आघाडी (भाजपा)
उत्तर मुंबई: पीयूष गोयल ९ हजार मतांची आघाडी (भाजपा)
उत्तर-पूर्व: संजय दिना पाटील १०,३०४ मतांनी आघाडीवर (शिवसेना-ठाकरे गट) 
उत्तर-पश्चिम: अमोल कीर्तिकर ११६२ मतांची आघाडी (शिवसेना-ठाकरे गट)

Web Title: Lok Sabha Result 2024 In Mumbai Mahayuti leads in 4 seats and Mva leads in 2 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.