Join us

लोककलावंतांच्या मदतीसाठी 'लोककलाविष्कार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:11 AM

मुंबई : कोरोनाकाळात कलाकार सगळ्यात भरडला गेला. लोककलावंतांचे हाल बेहाल झाले. कलाकारांच्या मदतीसाठी मिरीयाड आर्ट्स या संस्थेने पुढाकार घेतला ...

मुंबई : कोरोनाकाळात कलाकार सगळ्यात भरडला गेला. लोककलावंतांचे हाल बेहाल झाले. कलाकारांच्या मदतीसाठी मिरीयाड आर्ट्स या संस्थेने पुढाकार घेतला आहे. 'लोककलाविष्कार' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून गोळा झालेल्या निधीतून भारतीय संस्कृतीच्या जतनास हातभार लावणाऱ्या लोककलावंतांना मदत केली जाणार आहे.

लोककलावंतांच्या उन्नतीसाठी २०१७पासून या संस्थेतर्फे विविध कार्यक्रम राबवले जातात. ललित कला, कला सादरीकरण आणि कला व्यवस्थापनाची माहिती त्यांच्यापर्यंत विमामूल्य पोहोचवली जाते. या संस्थेचे सभासद हे विविध क्षेत्रांत काम करणारे मान्यवर आहेत. लोककलेच्या जतनासाठी पुढाकार घेत त्यांनी 'लोककलाविष्कार' ही स्पर्धा आयोजित केली आहे. या माध्यमातून गोळा केलेला निधी हा भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या सच्चा लोककलावंतांना दिला जाणार आहे.

स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी अजून धोका टळलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशाचे सर्व नियम पळून यावर्षीदेखील ती ऑनलाईन माध्यमातून स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २० सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. २ ऑक्टोबर रोजी निकाल घोषित केला जाणार आहे.