लोकमत बेस्ट सोसायटी अवॉर्ड्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 02:05 AM2020-01-09T02:05:29+5:302020-01-09T02:05:33+5:30

स्वच्छ, सुंदर, आनंदी, आरोग्यदायी, सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही मुंबईची शोभा वाढविण्याकरिता ‘लोकमत’ने आता आणखी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

Lokmat Best Society Awards | लोकमत बेस्ट सोसायटी अवॉर्ड्स

लोकमत बेस्ट सोसायटी अवॉर्ड्स

googlenewsNext

मुंबई : स्वच्छ, सुंदर, आनंदी, आरोग्यदायी, सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही मुंबईची शोभा वाढविण्याकरिता ‘लोकमत’ने आता आणखी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. ‘लोकमत’ आता मुंबईतल्या उत्तमोत्तम अशा सोसायटीचा गौरव करणार असून, त्याकरिता ‘लोकमत’ने ‘बेस्ट सोसायटी अवॉर्ड’ची घोषणा केली आहे. स्तुत्य उपक्रम हाती घेत, सर्वांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या, प्रेरणा देणाºया सोसायटीचा या अंतर्गत गौरव करण्यात येणार आहे.
‘बेस्ट सोसायटी अवॉर्ड’ अंतर्गत वेगवेगळ्या स्तरावर सोसायट्यांचे निरीक्षण केले जाईल. यामध्ये जलसंवर्धन, प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता, जल व्यवस्थापन, ऊर्जा बचत आणि संवर्धन याचा समावेश असेल. यात केवळ पुरविल्या जाणाºया सेवा-सुविधा नाही, तर सोसाट्यांनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचाही समावेश असेल. विशेषत: सोसायटीमधील सदस्य, कुटुंबे कशी गुण्यागोविंदाने वास्तव्य करतात; एकत्र राहतात याचाही समावेश असेल. ‘बेस्ट सोसायटी अवॉर्ड’मध्ये बंगले, चाळी, अपार्टमेंट, कॉलनी, कॉम्प्लेक्स आणि टाउनशिप अशा विविध भागांचा समावेश असेल.
‘बेस्ट सोसायटी अवॉर्ड’मध्ये भाग घेण्यासाठी ज्या सोसायट्यांकडून अर्ज सादर केले जातील, ते अर्ज निवड समिती सदस्यांकडून शॉर्ट लिस्टेड केले जातील. त्यानंतर, निवड समितीचे सदस्य त्यापैकी ५० सोसायट्यांना भेट देतील. त्यांची पाहणी करतील. त्यातून ज्या सोसायट्या विजयी ठरतील, त्यांना एका दिमाखदार सोहळ्यात गौरविण्यात येईल.
‘बेस्ट सोसायटी अवॉर्ड’साठी प्रीती अ‍ॅपलायन्स पार्टनर आहे. या अंतर्गत जे त्यांच्या नवीन उत्पादनांसह ग्राहकांना आधार देऊन बदल घडवून आणण्यास इच्छुक आहेत. जेणेकरून सकस अन्न तयार करण्यात, आरोग्यदायी जीवनशैली जगण्यास मदत होईल. प्रीती झोडॅक २.० मिक्सर-ग्राइंडर हे आरोग्याबद्दल जागरूक ग्राहकांसाठी तंत्रज्ञानाने साकारलेले त्यांचे नवे उत्पादन आहे.
‘बेस्ट सोसायटी अवॉर्ड’मध्ये भाग घेऊ इच्छिणाºया सोसायट्यांनी आपले अर्ज हहह.छडङटअळ.उडट/इएरळरडउकएळअहअफऊर/ या संकेतस्थळावर पाठविता येतील किंवा ८१०८४६९४०७ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Lokmat Best Society Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.