लोकमत रक्तदान मोहीम; महामुंबईतील नागरिक जपताहेत रक्ताचं नातं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:06 AM2021-07-16T04:06:33+5:302021-07-16T04:06:33+5:30
मुंबई : रक्तदान हेच श्रेष्ठदान असे म्हटले जाते. हेच लक्षात घेता लोकमतच्या महारक्तदान मोहिमेत राज्यभरातून अनेक रक्तदाते सहभागी झाले ...
मुंबई : रक्तदान हेच श्रेष्ठदान असे म्हटले जाते. हेच लक्षात घेता लोकमतच्या महारक्तदान मोहिमेत राज्यभरातून अनेक रक्तदाते सहभागी झाले आहेत. देशात आजवर आलेल्या संकटांमध्ये महाराष्ट्र नेहमी देशाच्या मदतीला धावून गेला आहे. म्हणूनच येत्या काळात रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाला उपचारात अडचण येऊ नये, यासाठी स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमतच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या या रक्तदान शिबिराचे देशभरात राजकीय, सामाजिक व कला क्षेत्रातून कौतुक होत आहे. नातं रक्ताचं नातं जिव्हाळ्याचं' या मोहिमेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराला महामुंबईतदेखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
रक्तदान शिबिराची ठिकाणे
तारीख /उपनगर/ सहयोगी संस्था / पत्ता / वेळ
१६ जुलै - डोंबिवली पूर्व : पंढरीनाथ म्हात्रे भाजपा उपाध्यक्ष डोंबिवली शहर पूर्व मंडळ / स्वामी नारायण हॉल पहिला मजला, गांधी नगर डोंबिवली पूर्व / ९ ते २
१६ जुलै - ठाणे : ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखा / तीन हात नाका ट्राफिक पोलीस ऑफिस / ११ ते ४
-------------
१७ जुलै - पेण वडखळ : जेएसडब्ल्यू / संजीवनी हॉस्पिटल, जेएसडब्ल्यू, वडखळ / ९ ते ६
१७ जुलै - घाटकोपर पश्चिम : रोटरॅक्ट क्लब मुंबई घाटकोपर आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ एस के सोमय्या कॉलेज / पतनवाला इस्टेट गुड वूड बिल्डिंग, पहिला मजला, एल बी एस मार्ग घाटकोपर पश्चिम / १० ते २
१७ जुलै - कांदिवली पश्चिम : विनायक पाटील कार्यवाह श्री एकवीरा विद्यालय, चारकोप कांदिवली पश्चिम, प्रेरणा फाउंडेशन / श्री एकवीरा विद्यालय सेक्टर १ चारकोप कांदिवली पश्चिम / ११ ते ४
१७ जुलै - ग्रँट रोड पूर्व : रोटरॅक्ट क्लब ऑफ कॅडूसेअस आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रल / बॉम्बे वायएमसीए, लॅमिंग्टन रोड ग्रँट रोड पूर्व / १० ते ४
--------------
१८ जुलै - विरार पश्चिम : कच्छ युवक संघ, विरार शाखा / पहिला मजला, राम मंदिर, एमबी इस्टेट, विरार पश्चिम / ९:३० ते ४:३०
१८ जुलै - बोरिवली पश्चिम : कच्छ युवक संघ, बोरिवली दहिसर शाखा / पहिला मजला, अय्यप्पा मंदिर कॉम्प्लेक्स, नंदिधाम ऑडिटोरियम, एस व्ही मार्ग, कल्याण ज्वेलर्स जवळ बोरिवली पश्चिम / ९ ते २
१८ जुलै - शिवडी : कच्छ युवक संघ, साऊथ बॉम्बे शाखा / ज्यूलीएट हाऊस, टी जे मार्ग, शिवडी नाका, शिवडी / ९ ते ६
१८ जुलै - मुलुंड पूर्व : केळकर एज्युकेशन ट्रस्ट स्थापित, वि.ग.वझे काॅलेज ऑफ आर्ट्स,सायन्स अॅण्ड कॉमर्स / मिठागर रोड, मुलुंड-(पूर्व) / १० ते ५
१८ जुलै - अंधेरी पूर्व : जन प्रहार फाउंडेशन, भिमेश नरसप्पा मुतुला, राज्य सचिव, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक, श्रमिक कामगार संघटना आणि जन प्रहार वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख / श्री लक्ष्मी नारायण हॉल, अँधेरी कुर्ला मार्ग नटराज स्टुडिओ, आकाश कॉलेज जवळ अंधेरी पूर्व / ९ ते ३
१८ जुलै - पालघर : कच्छ युवक संघ पालघर शाखा / चहाडे पालघर / ९ ते ४
१८ जुलै - ठाणे पश्चिम / जयश्री राजेश सोलंकी उडान एक सामाजिक प्रतिष्ठान / शॉप नंबर ९ जयश्री सलोन ॲण्ड स्पा, नीळकंठ हाइट्स ठाणे पश्चिम / १२ ते ५
१८ जुलै - ठाणे पश्चिम : अर्पण फाउंडेशन, भावना डुंबरे / क्लब हाऊस, हिरानंदानी इस्टेट, जीबी मार्ग, ठाणे पश्चिम / १० ते २
१८ जुलै - ठाणे पश्चिम : शिवसेना शाखाप्रमुख महेंद्र लक्ष्मणराव देशमुख आणि सहकारी, सिव्हिल इंजिनियर, एस इ ओ, अध्यक्ष स्पर्श फाउंडेशन / सांजस्नेह सीनियर सिटीजन हॉल ब्रम्हांड पोलीस स्टेशनच्या जवळ जीबी मार्ग ठाणे पश्चिम / १० ते ४
१८ जुलै - ठाणे पश्चिम : कच्छ युवक संघ ठाणे शाखा / श्री वर्धमान जैन स्थानक, एसी हॉल तिसरा मजला नौकाविहार ठाणे पश्चिम / ९ ते ६
येथे संपर्क साधा.
'लोकमत'च्या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी मुंबई महानगर प्रदेशात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी रोनाल्ड डिसोझा यांना ९०८२९९६५८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
या संकेतस्थळावर नोंदणी करा
http://bit.ly/lokmatblooddonation