लोकमत रक्तदान मोहीम; महामुंबईतून उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:06 AM2021-07-18T04:06:09+5:302021-07-18T04:06:09+5:30
मुंबई : रक्तदान हेच श्रेष्ठदान असे म्हणत लोकमतच्या महारक्तदान मोहिमेत राज्यभरातून अनेक रक्तदाते सहभागी झाले आहेत. संकटकाळात महाराष्ट्र नेहमी ...
मुंबई : रक्तदान हेच श्रेष्ठदान असे म्हणत लोकमतच्या महारक्तदान मोहिमेत राज्यभरातून अनेक रक्तदाते सहभागी झाले आहेत. संकटकाळात महाराष्ट्र नेहमी देशाच्या मदतीला धावून गेला आहे. म्हणूनच येत्या काळात रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाला उपचारात अडचण येऊ नये यासाठी स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या रक्तदान शिबिराचे देशभरातून कौतुक होत आहे. नातं रक्ताचं नातं जिव्हाळ्याचं' या मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराला महामुंबईतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
रक्तदान शिबिराची ठिकाणे
तारीख /उपनगर/ सहयोगी संस्था / पत्ता / वेळ
१८ जुलै - विरार पश्चिम : कच्छ युवक संघ, विरार शाखा / पहिला मजला, राम मंदिर, एमबी इस्टेट, विरार पश्चिम / ९:३० ते ४:३०
१८ जुलै - बोरिवली पश्चिम : कच्छ युवक संघ, बोरिवली दहिसर शाखा / पहिला मजला, अय्यप्पा मंदिर कॉम्प्लेक्स, नंदिधाम ऑडिटोरियम, एस. व्ही. मार्ग, कल्याण ज्वेलर्स जवळ बोरिवली पश्चिम / ९ ते २
१८ जुलै - शिवडी : कच्छ युवक संघ, साऊथ बॉम्बे शाखा / ज्यूलिएट हाऊस, टी जे मार्ग, शिवडी नाका, शिवडी / ९ ते ६
१८ जुलै - मुलुंड पूर्व : केळकर एज्युकेशन ट्रस्ट स्थापित, वि. ग. वझे काॅलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स / मिठागर रोड, मुलुंड-(पूर्व) / १० ते ५
१८ जुलै - अंधेरी पूर्व : जन प्रहार फाउंडेशन, भीमेश नरसप्पा मुतुला, राज्य सचिव, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक, श्रमिक कामगार संघटना आणि जन प्रहार वैद्यकीय साहाय्यता कक्षप्रमुख / श्री लक्ष्मी नारायण हॉल, अंधेरी कुर्ला मार्ग नटराज स्टुडिओ, आकाश कॉलेजजवळ अंधेरी पूर्व / ९ ते ३
१८ जुलै - पालघर : कै. हरिश्चंद्र पांडुरंग पाटील सभागृह/चहाडे पालघर / ९ ते ४
१८ जुलै - ठाणे पश्चिम / जयश्री राजेश सोलंकी उडान एक सामाजिक प्रतिष्ठान / शॉप नंबर ९ जयश्री सलोन अँड स्पा, निळकंठ हाइट्स ठाणे पश्चिम / १२ ते ५
१८ जुलै-ठाणे पश्चिम : अर्पण फाउंडेशन, भावना डुंबरे/क्लब हाऊस, हिरानंदानी इस्टेट, जीबी मार्ग, ठाणे पश्चिम / १० ते २
१८ जुलै - ठाणे पश्चिम : शिवसेना शाखाप्रमुख महेंद्र लक्ष्मणराव देशमुख आणि सहकारी, सिव्हिल इंजिनियर, एसइओ, अध्यक्ष स्पर्श फाउंडेशन / सांजस्नेह सीनियर सिटिजन हॉल ब्रह्मांड पोलीस स्टेशनजवळ जीबी मार्ग ठाणे पश्चिम / १० ते ४.
१८ जुलै - ठाणे पश्चिम : कच्छ युवक संघ ठाणे शाखा / श्री वर्धमान जैन स्थानक, एसी हॉल तिसरा मजला नौकाविहार ठाणे पश्चिम / ९ ते ६
१८ जुलै - ठाणे : जस्टो रिव्हर वूड पार्क/रिव्हरवुड पार्क सेल्स गॅलरी, रिव्हर वूड पार्क, कल्याण शिळफाटा मार्ग, खिडकाळेश्वर मंदिराजवळ सागर्ली गाव डोंबिवली / १० ते ४
१८ जुलै - दहिसर पूर्व : कच्छ युवक संघ बोरिवली दहिसर शाखा / रोटरी गार्डन युनियन बँकेजवळ, सीएसरोड ३ दहिसर पूर्व / ९ ते ३
येथे संपर्क साधा
'लोकमत'च्या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी मुंबई महानगर प्रदेशात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी रोनाल्ड डिसोझा यांना ९०८२९९६५८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
या संकेतस्थळावर नोंदणी करा
http://bit.ly/lokmatblooddonation