Join us

लोकमत कालदर्शिका ही सामान्य माणसाची मार्गदर्शिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:19 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकमत कालदर्शिका २०२१ ही नुसती दिनदर्शिका नसून सामान्य माणसांची मार्गदर्शिका आहे, असे उद्गार अभिनेते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लोकमत कालदर्शिका २०२१ ही नुसती दिनदर्शिका नसून सामान्य माणसांची मार्गदर्शिका आहे, असे उद्गार अभिनेते भरत जाधव यांनी काढले. ‘लोकमत कालदर्शिका २०२१’चे प्रकाशन भरत जाधव यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी त्यांनी हे मत मांडले.

कालदर्शिका दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रकाशित करण्यात आली आहे. लोकमत कालदर्शिका २०२१मध्ये जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य श्री अण्णासाहेब मोरे, श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे, अभिनेत्री अश्विनी भावे, डॉ. प्रमोद कोलवाडकर, आशुतोष शेवाळकर, शेफ विष्णू मनोहर, डॉ. रविराज अहिरराव, सीए डॉ. दिलीप सातभाई, विनायक सामंत, प्रदीप भिडे, रामकृष्ण क्षीरसागर महाराज या मान्यवरांनी अध्यात्म आरोग्य क्रीडा, संस्कृती, पाककृती सामान्य ज्ञान या विषयांवर व पंचांग, राशी भविष्य, नक्षत्र याविषयी सखोल माहिती दिली आहे.

आजच्या धावपळीच्या आयुष्यात ही माहिती उपयुक्त आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, लोकमत कार्यालयामध्ये दिनदर्शिका उपलब्ध आहे, असे कालदर्शिकेचे प्रमुख व्यवस्थापक विजय झिमूर यांनी सांगितले.