Join us

Lokmat Digital Creator Awards 2023: 2000 कोटींची देवाण-घेवाण झाली? आदित्य ठाकरे म्हणतात- संजय राऊतांचा दावा खरा असू शकतो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 7:56 PM

Lokmat Digital Creator Awards : 'यांनी गद्दारी करुन सत्ता मिळवली. जनतेला यांची गद्दारी आवडली नाही.

Lokmat Digital Creator Awards 2023: मुंबईत लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड 2023 सोहळा पार पडला. या सोहळ्यात डिजिटल इन्फ्ल्युन्सर्सचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. लोकमत मीडियाचे संपादकीय संचालक आणि सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा आणि मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, 'यांनी गद्दारी करुन सत्ता मिळवली. पण, यांचे मित्रपक्ष आणि गद्दार फक्त सर्वेवर चालतात. त्यांनी सर्वे केलाय, त्यात यांची युती कोणालाच आवडली नाहीये. ज्यांना आम्ही तिकीट दिले, मोठे केले, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसलंय. सांगून गेले असते तर काही वाटलं नसतं. येत्या काही दिवसात मुंबई बीएमसीच्या निवडणुका होतील, तेव्हा त्यांना कळेल.' 

'गद्दार आमदारांचे आज ना उद्या निलंबन होणार' ; आदित्य ठाकरेंची तोफ डागली

संजय राऊत म्हणाले दोन हजार कोटींची देवाण-घेवाण झाली, यावर आदित्य म्हणतात, 'शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अनैसर्गिक युती होती. पण, जे नेहमी दूर होते, ते जवळ आले आणि जे जवळ होते, ते गद्दारी करुन दूर गेले. कागदपत्रे न तपासता निवडणूक आयोगाने निर्णय घेतला. आयोग त्यांच्या बाजूने गेलाय. चोवीस तासात फाईल कशी पास झाली. दोन हजार कोटींची देवाण घेवाण झालीच असेल. चोरी केली नसेल, तर समोर या. चोरी केली म्हणून गुवाहाटीला पळून गेले,' अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेभाजपालोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड्स २०२४आदित्य ठाकरे