मुंबई- मुंबईत मोठ्या दिमाखात लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२३ सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्यात डिजिटल इन्फ्ल्युन्सर्सचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात एका प्रश्नाचे उत्तर दिलखुलासपण उत्तर दिले.
'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे संबंध आजही चांगले आहेत. आमच्या मनात कटुता नाही, माझ मनं साफ आहे. आमच्या घरात असंच वातावरण आहे. आमच्यावर अनेकांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते, पण आम्ही कधीच तशी टीका केलेली नाही, महाराष्ट्र जाणतो बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध कसे होते. आम्ही पर्सनली काही घेत नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
" आम्ही त्यांना दोस्त मानतो पण ते आम्हाला काय मानतात, त्यांच्या मनात काय आहे हे आम्हाला माहित नाही, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
"… ते आज आमच्या सर्वच गोष्टींवर दावा करतायत,"
“आमच्या पक्षाचं, आमच्या कुटुंबाचं एकाद वेळी बाजूला ठेवा. पण आज राज्यात असंवैधानिक सरकार बसलं आहे, ९ महिन्यांपासून कोणतेही निर्णय घेतले जात आहे. घोटाळ्यांवर घोटाळे बाहेर येत आहेत. ते सर्वच गोष्टींवर दावा करतायत. नाव घ्या, कुटुंबाचं घ्या, आजोबांचं नाव चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाहीचे या कठिण दिवसातून जात आहोत. केवळ महाराष्ट्रातच नाही. तुम्ही कधीही सांगा आम्हाला हे आवडलं नाही, ते सेन्सॉर केलं जातं, ट्रोल केलं जातं, तुमच्या विरोधात पोलीस केसेस होतात. अशा गोष्टी लोकशाहीसाठी घातक आहेत. माध्यमांचं स्वातंत्र्य आज धोक्यात आहे. आपल्या देशात अघोषित हुकुमशाही सुरू आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.