लोकमत इफेक्ट : कामगार कल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार केला कमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 02:20 AM2020-10-28T02:20:30+5:302020-10-28T02:20:58+5:30

राज्याच्या कामगार विभागाने कामगार कल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार कमी करून कामगार कल्याण आयुक्तपदी वर्ग १च्या अधिकाऱ्याची नुकतीच प्रतिनियुक्ती केली आहे.

Lokmat effect: Additional workload for the post of Labor Welfare Commissioner reduced! | लोकमत इफेक्ट : कामगार कल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार केला कमी!

लोकमत इफेक्ट : कामगार कल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार केला कमी!

Next

मुंबई : राज्याच्या कामगार विभागाने कामगार कल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार कमी करून कामगार कल्याण आयुक्तपदी वर्ग १च्या अधिकाऱ्याची नुकतीच प्रतिनियुक्ती केली आहे.

कामगार कल्याण मंडळाचा आयुक्त पदाचा (वर्ग १) अतिरिक्त कार्यभार बेकायदा (वर्ग ३)चे कनिष्ठ अधिकारी सहायक कल्याण आयुक्त (निधी) महेंद्र तायडे यांना दिल्यामुळे कामगार कल्याण अधिनियम १९५३ व अतिरिक्त कार्यभार देण्याबाबतच्या शासन निर्णयाचा भंग होऊन मंडळातील कोट्यवधींच्या कामगार निधीच्या भ्रष्टाचाराबाबत मागील नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी लक्षवेधी  मांडली होती. तायडे यांची मंडळातील मूळ नियुक्ती बोगस असून मंडळाच्या सेवेतून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी आमदार प्रभू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. ‘दैनिक लोकमत’नेसुद्धा यासंदर्भात सातत्याने वृत्त दिले होते.

कामगार विभागाने दखल घेत २२ ऑक्टोबरच्या आदेशानुसार महेंद्र तायडे, सहायक कल्याण आयुक्त (निधी) या वर्ग ३च्या कनिष्ठ अधिकाऱ्याचा कामगार कल्याण आयुक्त पदाचा त्यांना दिलेला अतिरिक्त कार्यभार कमी करून कामगार कल्याण आयुक्तपदी कामगार कल्याण अधिनियम १९५३मधील तरतुदीनुसार वर्ग१चे कामगार उपायुक्त रविराज इळवे यांची प्रतिनियुक्ती केली. सिटीजन्स जस्टिस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र संघटनेचे सरचिटणीस रफिक मुलाणी यांनी सांगितले की, कामगार विभागाने नियमाने कल्याण आयुक्त पदावर वर्ग १चे कामगार उपायुक्त रविराज इळवे यांची प्रतिनियुक्ती करून कायद्याची अंमलबजावणी केली. परंतु महेंद्र तायडे यांची मूळ नियुक्ती बोगस असणे, कामगार हिताच्या नसलेल्या एनआयटी प्रकल्पासाठी बेकायदा रु.१० कोटी अदा करणे आणि मंत्री (गृह) यांच्या आदेशाने तायडे व कुटुंबीयांची प्रलंबित अपसंपदा  इत्यादी गंभीर तक्रारींची चौकशी प्रलंबित असताना कामगार विभागाने त्यांना बक्षीसच दिल्याची प्रतिक्रिया दिली. 
 

Web Title: Lokmat effect: Additional workload for the post of Labor Welfare Commissioner reduced!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.