वाचकांना समृद्ध करणारे ‘लोकमत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 00:26 IST2021-02-21T00:26:23+5:302021-02-21T00:26:33+5:30
विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकमत समाजजीवन समृध्द करण्याचे काम अविरत करीत आहे. अशा शब्दांत विजय दर्डा यांनी लोकमतचा उल्लेख केला.

वाचकांना समृद्ध करणारे ‘लोकमत’
केवळ बातम्या देण्यापुरते ‘लोकमत’ मर्यादित राहिलेले नाही. त्यासोबतच समाजातील चांगल्या बाबींना प्रसारित करण्याचे, त्याला अधिक समृद्ध करण्याचे काम लोकमतने केले आहे. लोकमत सखी मंच, महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कार, राजधानी दिल्लीत संसदीय पुरस्कार, पुण्यात वूमेन समिट, सरपंच अवॉर्ड, डॉक्टर अवॉर्ड अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकमत समाजजीवन समृध्द करण्याचे काम अविरत करीत आहे. अशा शब्दांत विजय दर्डा यांनी लोकमतचा उल्लेख केला.
चांगल्या लोकांना शक्ती देण्याचे काम केले आहे. त्यामुळे लोकमत परिवारातील सर्व सदस्यांचे आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो. या सर्व उपक्रमांना, प्रकल्पांना आपले मानून या मंडळींनी स्वत:ला यात झोकून दिले आहे. लोकमतच्या यशाचे रहस्य म्हणजे लोकमतमधील परिवाराची, कुटुंबाची भावना.
आपल्याला ऐकून आनंद होईल की, यंदा ‘नागपूर लोकमत’ आपल्या स्थापनेचे सुवर्णजयंती वर्ष साजरे करीत आहे. या प्रसंगी ज्योत्स्ना यांच्या व्हिजनला मी सलाम करतो. त्यांनी महिलांच्या उत्थानासाठी सखी मंच उभारला, त्यांना व्यासपीठ उभे करून दिले. आज राज्यातील साडेतीन लाखांहून अधिक महिला या सखी मंचसोबत जोडल्या गेल्या आहेत. देशभरात महिलांचे यासारखे दुसरे मोठे मंच, व्यासपीठ नाही, असे ते म्हणाले.