लोकमत इम्पॅक्ट! 'त्या' ७२९ कुटुंबांच्या घरे मिळण्याच्या आशा पल्लवित
By मनोहर कुंभेजकर | Published: April 3, 2024 06:23 PM2024-04-03T18:23:10+5:302024-04-03T18:23:27+5:30
लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे पाऊल येथील जनतेने मागे घ्यावे आणि आपला मतदानाचा अधिकार बजावावा हे आवाहन केले.
मुंबई-त्रिमूर्ती गृहनिर्माण संस्था मर्या गोरेगाव पूर्व येथील झोपडपट्टी पुनर्विकासात १४ वर्षे अडकलेल्या प्रकल्पाच्या रहिवाश्यानी मतदानावर बहिष्कार घातला होता.या संदर्भात सविस्तर वृत्त लोकमत ऑनलाईन वर दि,28 मार्च रोजी दैनिक लोकमतमध्ये दि, २९ मार्च रोजी प्रसिद्ध झाले होते.
लोकमतच्या बातम्यांची दखल घेत प्रशासनाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी २७, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे संदीप आहेर यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार, एसआरएचे सहाय्यक अभियंता , सक्षम प्राधिकारी क्रमांक-५ एसआरए, पालिकेचे सहाय्यक आयुक्त पी/दक्षिण विभाग यांच्या समवेत त्रिमूर्ती संस्थेचे पदाधिकारी आणि युवा त्रिमूर्ती ग्रुपचे सदस्य यांची काल दि, २ एप्रिल २०२४ रोजी संयुक्त बैठक झाली. सदर बैठकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीसंदर्भात घेतलेल्या विषयावर पुनर्विचार करून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे पाऊल येथील जनतेने मागे घ्यावे आणि आपला मतदानाचा अधिकार बजावावा हे आवाहन केले.
एसआरए प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी हा विषय लवकरात लवकर सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत मिटिंग करिता वेळ देण्याचे आश्वासन सदस्यांना देण्यात आले.
लोकमतच्या या बातम्यांमुळे आम्हा ७२९ कुटुबांच्या घर मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या. निवडणूक अधिकारी, एसआरए,पालिका प्रशाशन अशा सगळ्यांनी आमची निदान दाखल घेतली याचे लोकमतला जाते. ज्या मीटिंग साठी आम्ही इतकी वर्षे प्रतीक्षा करत होतो ती मीटिंग लवकर एसआरएचे सीईओ,बिल्डर आणि आमच्यात घडून येणार असे आम्हाला आश्वासन मिळाले. पराग परब, राहिवासी