लोकमत इम्पॅक्ट: पालिका शाळांच्या साफसफाई कंत्राट घोटाळा टेंडरवरून शिक्षण समितीत जोरदार खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 07:09 PM2020-12-14T19:09:25+5:302020-12-14T19:09:43+5:30

- मनोहर कुंभेजकर मुंबई:  महापालिकेच्या शिक्षण विभागाकरता मुंबई मधील २४ विभागातील महापालिका शाळांमध्ये पुढील तीन वर्षांकरत निर्जंतुकीकरण करणे, साफसफाई ...

Lokmat Impact: Municipal school cleaning contract scam | लोकमत इम्पॅक्ट: पालिका शाळांच्या साफसफाई कंत्राट घोटाळा टेंडरवरून शिक्षण समितीत जोरदार खडाजंगी

लोकमत इम्पॅक्ट: पालिका शाळांच्या साफसफाई कंत्राट घोटाळा टेंडरवरून शिक्षण समितीत जोरदार खडाजंगी

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर

मुंबई:  महापालिकेच्या शिक्षण विभागाकरता मुंबई मधील २४ विभागातील महापालिका शाळांमध्ये पुढील तीन वर्षांकरत निर्जंतुकीकरण करणे, साफसफाई स्वच्छता आणि परिचारक मनुष्यबळ पुरवण्या करता निविदा मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत मागविण्यात आल्या आहेत. 

आज पालिका मुख्यालयात झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत यांचे तीव्र पडसाद उमटले व जोरदार खडाजंगी झाली. कोणत्याही परिस्थितीत सदर टेंडर मंजूर करणार नाही असा ठोस इशारा पालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्ष संध्या विपुल दोशी यांनी दिला. प्रशासनाच्या या मनमानी कारभारा बद्धल शिक्षण समिती सदस्या व शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शीतल म्हात्रे तसेच सदस्या शुभदा गुडेकर,सदस्य साईनाथ दुर्गे यांनी हल्लाबोल चढवला.यावेळी अतिरिक्त आयुक्त(प्रभारी) आशुतोष सलील उपस्थित होते. लोकमत ऑनलाईन व लोकमतच्या अंकात या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले होते. 

शीतल म्हात्रे यांनी लोकमतच्या वृत्ताचा हवाला देत सदर टेंडर प्रकरणी पालिका प्रशासनाची भूमिका काय आहे? मंत्री महोदयांनी चौकशी करण्याची मागणी केली असतांना परत येत्या दि, 20 तारखेला टेंडर तुम्ही कसले काढता असा सवाल केला.सदर टेंडर रद्द करण्याची आग्रही मागणी करून अहवाल सादर करण्याची मागणी त्यांनी केली.

या संदर्भात शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद,प्रवक्ते,आमदार सुनील प्रभू यांनी चौकशीची मागणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. तर मंत्री महोदयांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे केली होती.ठराविक कंत्राटदारांना मदत करण्याची भूमिका दिसत असून  अशा प्रकारे सर्वांच्या डोळ्यात धूळफेक करून निविदा बनविणाऱ्या संबंधित खाते प्रमुख आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांची निःपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी आमदार प्रभू यांनी मंत्री महोदयांकडे एका पत्राद्वारे केली होती.लोकमतने याप्रकरणी वाचा फोडली.

खरेतर कोरोना कालावधीत खाजगी कंत्रादारांपेक्षा महापालिका कीटक नाशक विभागाने उत्कृष्ठ काम केले असून महापालिकेच्या शाळांमध्ये देखिल महापालिका कीटक नाशक विभागामार्फत काम करणे गरजेचे आहे. या निविदेत प्रस्तावित कामे जसे की झाडू करणे, वर्गखोल्या साफ करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, पाण्याचे पंप सुरू करणे, लाईट लावणे, मुतारी आणि शौचालये साफ सफाई करणे, धूळ झाडणे, निर्जंतुकीकरण करण्याकरता कीटकनाशके फवारणी करणे, शाळेचा आवार झाडणे, सुरक्षा व्यवस्था पुरविणे इत्यादी नमूद कामे ही शाळेचे शिपाई, हमाल आणि माळी तथा पर्यवेक्षक पूर्वांपार करत आलेले आहेत. मग आता टेंडरचा घाट का घातला असा सवाल आपण पालिका प्रशासनाला केल्याची माहिती शीतल म्हात्रे यांनी दिली.

Web Title: Lokmat Impact: Municipal school cleaning contract scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.