लोकमत इम्पॅक्ट ! ‘अट्रोसिटी’तील गुन्ह्यांच्या पंचनाम्यात आता सरकारी पंच!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 09:35 PM2019-06-30T21:35:05+5:302019-06-30T21:35:37+5:30

फिर्यादी,साक्षीदारांचेही जबाब न्यायालयासमोर होणार, चार वर्षातील निर्दोष खटल्याचा फेरआढावा

Lokmat impact Now the government punch in 'Panic' of Atrocity! | लोकमत इम्पॅक्ट ! ‘अट्रोसिटी’तील गुन्ह्यांच्या पंचनाम्यात आता सरकारी पंच!

लोकमत इम्पॅक्ट ! ‘अट्रोसिटी’तील गुन्ह्यांच्या पंचनाम्यात आता सरकारी पंच!

Next

जमीर काझी

मुंबई :राज्यात दलितावरील अत्याचाराच्या वाढत्या गुन्ह्याचा लेखाजोखा ‘लोकमत’ने मांडल्यानंतर पोलीस दलाने गुन्ह्याच्या प्रतिबंधासाठी ठोस निर्णय घेतले असून या गुन्ह्यांच्या पंचमान्यासाठी आता सरकारी पंच घेतले जाणार आहेत. त्याचप्रमाणे फिर्यादी,साक्षीदार,पंच यांचे जबाब आता न्यायदंडाधिकाऱ्यासमोर घेण्यात येणार आहे. या गुन्ह्यांमध्ये फितुर होण्याचे प्रमाण वाढत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याची सूचना सर्व पोलीस घटक प्रमुखांना करण्यात आले असल्याचे नागरी हक्क संरक्षण विभागाचे प्रमुख, विशेष महानिरीक्षक कैसर खलीद यांनी सांगितले.

‘अट्रोसिटी’चे राज्यातील गेल्या सव्वा पाच वर्षातील गुन्हे, प्रलंबित खटले व दोष सिद्धतेचे प्रमाण,तपासातील त्रुटी आदीच्या सध्यस्थितीचा आढावा घेणारी‘अट्रोसिटीचे दाहक वास्तव’या शिर्षकाची तीन भागाची वृत्त मालिका ‘लोकमत’ने २६ ते २८ जून या कालावधीत प्रकाशित केली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यानुसार ‘अ‍ॅट्रोसिटी’च्या गुन्ह्यामध्ये आता पंच म्हणून सरकारी सेवेत असलेला अधिकारी,कर्मचारी घेतला जाणार आहे. जेणेकरुन खटल्याच्या सुनावणीवेळी तो फुटू नये, तसे केल्यास संबंधिताला कारवाईला सामोरे जावे लागेल,त्याचप्रमाणे खटल्याच्या सुनावणीवेळी फिर्यादी, साक्षीदार फितूर होतात, तसेच पोलिसांनी नोंदविलेल्या त्यांच्या जबाबावर बचाव पक्ष व न्यायालयाकडून शंका उपस्थित केली जात असल्याने त्याचा खटल्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यामुळे या सर्व घटकांचे जबाब आता तपास सुरु असताना न्यायदंडाधिकाºयासमोर घेतले जातील. त्यामुळे त्यांना आपल्या जबाबाचा इन्कार किंवा आक्षेप घेता येणार नाही. दलितावरील अत्याचाराच्या तपास कामाबाबत केलेल्या मार्गदर्शन सुचनांच्या अंमलबजावणीचा पोलीस मुख्यालयाकडून आढावा घेतला जाणार आहे. त्यामध्ये लवचिकता आणण्यासाठी आवश्यक ते बदल केले जातील, जिल्हास्तरीय, विभागीय समित्याचा फेरआढावा घेतला जाणार आहे.
अनुसुचित जाती, जमाती व नागरी हक्क संरक्षण कलमान्वये दरवर्षी राज्यात साधारणपणे २२०० ते २५०० गुन्हे दाखल होतात. तपासाअंती साधारणपणे त्यातील २० टक्के गुन्हे नमूद कलमान्वये ग्राह्य ठरत नसल्याने त्याचे आरोपपत्र दाखल केले जात नाही. त्याचे प्रमाण आणखी वाढविण्याचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे ८ ते १२ टक्के गुन्ह्यामध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल केलेल्या असतात. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगून कैसर खलीद म्हणाले,‘तपासाची गुणवत्ता वाढविण्यासाठी पोलीस मुख्यालय येथे विशेष कार्यालय तसेच जिल्हा व विभागीय स्तरावर वारंवार प्रशिक्षण कार्यक्रम व गुन्हे आढावा बैठक घेतली जात आहे. तपास अधिकाºयांना येणाºया अडचणीबाबत मागदर्शन केले जात आहे.’
------------
राज्यात २१ टक्के नागरिक ‘अनुसुचित जाती व जमातीचे आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत देशात महाराष्ट्र दुसऱ्या किंवा तिसºया स्थानी आहे. मात्र अनुसचित जातीच्या (एसी) गुन्ह्यामध्ये राज्य ५ व्या तर अनुसुचित जमाती (एसटी) सातव्या क्रमांकावर आहे. हे प्रमाणही कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
- कैसर खलीद (विशेष महानिरीक्षक, पीसीआर विभाग,महाराष्ट्र )
----------
प्रशिक्षणासाठी २५ लाखाचा निधी
दलितांवरील अत्याचाराला प्रतिबंध घालणे,गुन्ह्याच्या तपासाची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा व विभागीय स्तरावर प्रशिक्षण घेण्यासाठी समाज कल्याण व आदिवासी कल्याण विभागाकडून २५ लाखाचा निधी ‘पीसीआर’विभागाला मिळाला आहे.त्याचप्रमाणे डॉ.पायल तडवी प्रकरणात न्यायालयाने सुनावणीच्या रेकॉर्डिंग करण्याबाबतचा विषय विधी व न्या विभागाच्या अखत्यारित येत असल्याने त्यांच्याकडे त्याबाबत प्रस्ताव पाठविला असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
--------------
एसीबीच्या गुन्ह्यानंतर पहिल्यादाच सरकारी पंच
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) गुन्ह्यासाठी सरकारी पंच वापरले जातात. त्यानंतर आता अट्रोसिटीच्या गुन्ह्यामध्येही सरकारी पंच वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम खटल्याच्या दोष सिद्धतेमध्ये दिसून येणार आहे.




 

 

Web Title: Lokmat impact Now the government punch in 'Panic' of Atrocity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.