‘लोकमत लालबागची जत्रा’ वेब सीरिज: लालबागच्या राजाची न ऐकलेली कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 05:54 AM2017-09-03T05:54:16+5:302017-09-03T05:54:34+5:30

गणेशोत्सव सुरू झाला की लालबाग परिसराला जत्रेचे रूप प्राप्त होते. मुंबईसह देशभरातून अनेक भाविक ‘लागबागच्या राजा’चे दर्शन घेण्यासाठी लालबागमध्ये हजेरी लावतात. लालबागच्या राजाचा इतिहास, राजाला घडवणारे हात याविषयी मात्र अजूनही अनभिज्ञता आहे.

'Lokmat Lalbagh Ki Jatra' Web Series: The Unacceptable Story of Lalbauga Raja | ‘लोकमत लालबागची जत्रा’ वेब सीरिज: लालबागच्या राजाची न ऐकलेली कथा

‘लोकमत लालबागची जत्रा’ वेब सीरिज: लालबागच्या राजाची न ऐकलेली कथा

Next

मुंबई : गणेशोत्सव सुरू झाला की लालबाग परिसराला जत्रेचे रूप प्राप्त होते. मुंबईसह देशभरातून अनेक भाविक ‘लागबागच्या राजा’चे दर्शन घेण्यासाठी लालबागमध्ये हजेरी लावतात. लालबागच्या राजाचा इतिहास, राजाला घडवणारे हात याविषयी मात्र अजूनही अनभिज्ञता आहे. या लालबागच्या राजाची न ऐकलेली कथा ‘लोकमत लालबागची जत्रा’ या वेब सीरिजच्या माध्यमातून यंदा भाविकांसमोर आली आहे. या वेब सीरिजचे तीन भाग प्रदर्शित झाले असून याला तब्बल १३ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. अजून तीन भागांतून लालबागच्या राजाची न ऐकलेली कथा भाविकांना ऐकायला मिळणार आहे.
या वेब सीरिजमध्ये लालबागचे जुने फोटोदेखील यात भाविकांना पाहायला मिळणार आहेत. १९३५ सालापासून लालबागच्या राजाची मूर्ती कांबळी कुटुंबीय बनवत असून सध्या त्यांची तिसरी पिढी मूर्ती साकारत आहे. लालबागच्या राजासारख्या २५ प्रतिकृती जगभरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी तर, १२५ घरगुती गणेशमूर्ती तयार केल्या जातात. रत्नाकर कांबळी यांना लालबागच्या राजाच्या मूर्तीचे डोळे रंगवण्यासाठी ६ ते ८ तास लागतात. तर यंदाच्या राजाच्या मूर्तीचा चेहरा रंगवण्यासाठी तब्बल १२ तास लागले होते. गणेशोत्सवादरम्यान राजाचे सोवळे २२ वेळा बदलले जाते. दर्शन सुरू असतानाच मधल्या ४५ मिनिटांत सोवळे बदलले जाते. राजाचे सोवळे हे लांबीला ३९ मीटर आणि १३ मीटर रुंद असते. गेल्या २५ वर्षांपासून रूपेश पवार हे त्यांच्या ओमकार पत्रे आणि अन्य सहकाºयांबरोबर सोवळे नेसवतात. लालबागच्या राजामुळे वडापाव, पूजेचे साहित्य आणि दागिने विक्रेत्यांचाही फायदा होतो. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गरजूंसाठी १०० रुपयांत डायलेसिस सेंटर चालवते. विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू केले आहे. करिअर कौन्सिलिंग, नोकरीसाठी मार्गदर्शन असे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अशा अनेक न ऐकलेल्या गोष्टी या वेब सीरिजच्या माध्यमातून भाविकांना पाहता येणार आहेत.

येथे पाहा वेब सीरिज
‘लोकमत लालबागची जत्रा’ या वेब सीरिजला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ज्या भाविकांना ही वेब सीरिज पाहायची आहे त्यांनी  Lokmat.com, Lokmat Facebook page आणि Lokmat News YouTube channel  वर लॉग इन करा.

Web Title: 'Lokmat Lalbagh Ki Jatra' Web Series: The Unacceptable Story of Lalbauga Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.