लोकमत लाईफस्टाईल आयकॉन २०२० सोहळा उद्या रंगणार, २५ आयकॉनचा होणार गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 06:16 AM2021-01-22T06:16:05+5:302021-01-22T06:18:48+5:30

व्यक्ती आणि संस्था यांना उत्तमोत्तम कामगिरी करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘लोकमत लाईफस्टाईल आयकॉन २०२०’ सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या सोहळ्यात अशा २५ कर्तृत्ववान आयकॉनचा सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे.

Lokmat Lifestyle Icon 2020 ceremony will be held tomorrow | लोकमत लाईफस्टाईल आयकॉन २०२० सोहळा उद्या रंगणार, २५ आयकॉनचा होणार गौरव

लोकमत लाईफस्टाईल आयकॉन २०२० सोहळा उद्या रंगणार, २५ आयकॉनचा होणार गौरव

googlenewsNext

मुंबई : यशाची शिखरे पादक्रांत करणाऱ्या आणि सदैव गुणवत्तापूर्ण जीवनशैलीसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांच्या योगदानाचा गौरव उद्या, शनिवारी लोकमत लाईफस्टाईल आयकॉन २०२० सोहळ्यात करण्यात येणार आहे.

व्यक्ती आणि संस्था यांना उत्तमोत्तम कामगिरी करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘लोकमत लाईफस्टाईल आयकॉन २०२०’ सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या सोहळ्यात अशा २५ कर्तृत्ववान आयकॉनचा सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे.

विलेपार्ले पूर्वेकडील आंतरदेशीय विमानतळालगतच्या सहार स्टार या हॉटेलमध्ये शनिवारी सकाळी १० वाजता हा सोहळा रंगणार आहे. या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, अभिनेता स्वप्निल जोशी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. लागू बंधू मोतीलाल प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकिय संचालक दिलीप लागू, रिचमोंड इंडिया ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक अभिषेक भास्कर विचारे हेही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर, राजकारण, समाजकारण, अभिनय आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थितीही या सोहळ्यास लाभणार आहे.

हा सोहळा निमंत्रितांसाठी असून, कोरोना काळातील सर्व बंधने पाळून सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत लाईफस्टाईल आयकॉन २०२० या सोहळ्याचे ज्वेलरी पार्टनर लागू बंधू मोतीलाल प्रायव्हेट लिमिटेड आहेत, तर रिचमोंड इंडिया ग्रुप हे इव्हेंट पार्टनर आहेत.

Web Title: Lokmat Lifestyle Icon 2020 ceremony will be held tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.