लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३: मुंबईतील कोणता डॉक्टर तुम्हाला वाटतोय 'बेस्ट'? पाहा नामांकनं...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 05:02 PM2023-04-13T17:02:59+5:302023-04-13T17:03:40+5:30

वैद्यकीय-मुंबई या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.

Lokmat Maharashtrian of the Year 2023 Which doctor in Mumbai do you think is the best Check out the nominations and vote | लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३: मुंबईतील कोणता डॉक्टर तुम्हाला वाटतोय 'बेस्ट'? पाहा नामांकनं...

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३: मुंबईतील कोणता डॉक्टर तुम्हाला वाटतोय 'बेस्ट'? पाहा नामांकनं...

googlenewsNext

लोकसेवा/समाजसेवा, आयएएस, आयपीएस, राजकारण, शिक्षण, क्रीडा, कृषी, उद्योग/व्यवसाय, वैद्यकीय अशा क्षेत्रांमध्ये आपल्या उल्लेखनीय कामगिरीने जगभरात महाराष्ट्राचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या गुणवंतांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. वैद्यकीय-मुंबई या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.

यकृत, स्वादुपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतला विक्रम
डॉ. गौरव चौबळ लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन,  ग्लोबल हॉस्पिटल

डॉ. चौबळ यांनी महाराष्ट्रात यकृत प्रत्यारोपणाच्या ७०० पेक्षा अधिक शस्त्रकिया केल्या. ८ लहान आतड्याचे प्रत्यारोपण आणि ९ स्वादुपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. पश्चिम भारतात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमधील सध्याच्या काळातील तरुण शल्यचिकित्सक म्हणून त्यांनी ओळख मिळवली आहे. त्यांनी नॉर्थ कॅरोलिना येथील ड्यूक विद्यापीठात फेलोशिप केली. दिल्लीतील एम्स या नामांकित संस्थेत त्यांनी एमएसचे शिक्षण पूर्ण केले असून त्यांनी गोल्ड मेडल मिळविले आहे. या संस्थेतून गॅस्ट्रोइंट्रोलॉजी सर्जरीमध्ये एमसीएच ही पदवी प्राप्त केली. मुंबईतील स्वादुपिंड प्रत्यारोपणाची पहिली, राज्यातली लहान आतड्याच्या प्रत्यारोपणाची पहिली, आणि भारतातील लहान मुलाच्या लहान आतड्याच्या प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया त्यांच्या नावावर आहे. 
मत देण्यासाठी येथे क्लिक करा

प्रोस्टेट कॅन्सर शस्त्रक्रियेसाठी रोबोटचा वापर
डॉ. मंगेश पाटील, युरॉलॉजिस्ट, एच एन रिलायन्स हॉस्पिटल

डॉ. मंगेश पाटील गेली १५ वर्षे युरॉलॉजी विषयात काम करत असून, त्यांनी प्रोस्टेट आणि किडनी कॅन्सरच्या उपचारात आधुनिक तंत्रज्ञानाचा रोबोटचा वापर करून शस्त्रक्रियेस सुरुवात केली आहे. याकरिता न्यूयॉर्क येथील रोसेवेल विद्यापीठात जाऊन रोबोट शस्त्रक्रियेचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी आतापर्यंत युरॉलॉजीच्या ११०० रोबोट शस्त्रक्रिया केल्या असून, ६००० नॉन रोबोटिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी अनेक वैद्यकीय परिषदेमध्ये त्यांनी सहभाग घेऊन या विषयावरचे व्याख्यान त्यांनी अनेक ठिकाणी दिले आहे. त्यांना आशिया पॅसिफिक अवॉर्ड फॉर हेल्थ एक्ससेलेन्स २०१४ तसेच नवी दिल्ली येथील द इकॉनॉमिक अँड ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट असोसिएशनतर्फे बेस्ट डॉक्टर परफॉर्मन्स अवॉर्ड देण्यात आला आहे.
मत देण्यासाठी येथे क्लिक करा

उपचारांसोबत विद्यार्थी घडविण्याचे काम
डॉ. प्रज्ञा चंगेडे, गायनॅकॉलॉजिस्ट, सायन रुग्णालय

सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत प्रसूती तज्ज्ञ डॉ. प्रज्ञा चंगेडे अवघडलेल्या महिलांची सुखरूप सुटका करणे, गर्भवती महिलांची प्रसूती आणि लोकमान्य टिळक महापालिका वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना घडवणे या जबाबदाऱ्या गेल्या १४ वर्षांपासून समर्थपणे पेलतात. त्या गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या विषयावरही काम करत आहेत. दिवसाला ४० ते ५० महिलांच्या सर्व्हायकल कॅन्सर या आजाराचे निदान करण्यासाठी येतात, तेव्हा डॉ. चंगेडे त्यासाठी लागणारी पॅप स्मिअर चाचणी करून उपचाराची दिशा ठरवतात. सायन रुग्णालयात त्या आठवड्याला २५ ते ३० प्रसूती करतात. त्यात १० ते १२ सिझेरियन शस्त्रक्रिया असतात. स्त्रीरोग विषयावरील 'द जर्नल ऑफ ओब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी ऑफ इंडिया' या नियतकालिकात सरचिटणीस पदावर आहेत. 
मत देण्यासाठी येथे क्लिक करा

मुलांच्या हार्मोन्सवर उपचार करणारा डॉक्टर
डॉ. प्रशांत पाटील, पेडियाट्रिक्स इंडोक्रायनोलॉजिस्ट, एसआरसीसी हॉस्पिटल
 
लहान मुलांच्या हार्मोन्स या विषयावर काम करणारे भारतात फार कमी डॉक्टर आहेत. त्यात डॉ. प्रशांत पाटील यांचे नाव घेता येईल. लहान मुलांमधील हार्मोन्स आणि डायबेटीस विषयावर काम करणाऱ्या लंडनच्या रुग्णालयातून या विषयावरील फेलोशिप त्यांनी पूर्ण केली व भारतात या विषयावर काम सुरू केले. लहान मुलांमधील लठ्ठपणा, डायबेटीस, तसेच अकाली तारुण्य या विषयावर त्यांचे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. आपल्याकडे आजही या आरोग्य समस्यांकडे गंभीरपणे पाहिले जात नाही. अकाली तारुण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलींची उंची खुंटते. त्यावर हार्मोन्स इंजेक्शनच्या माध्यमातून पाळीचे वय लांबविता येते, अशा पद्धतीचे उपचार त्यांनी सुरू केलेत. लहान मुलांचा लठ्ठपणा यासाठी विशेष ओपीडी हा विभाग तयार केला आहे.
मत देण्यासाठी येथे क्लिक करा

पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियेत मोलाचे योगदान
डॉ. क्षितिज चौधरी, स्पाईन सर्जन, हिंदुजा हॉस्पिटल

जगभरातील ७० टक्के लोकांना आयुष्यात एकदा तरी पाठीच्या खालच्या भागाच्या आणि पायांच्या दुखण्याला (सायटिका) सामोरे जावे लागते. यासाठीच राज्यभरातून डॉ. क्षितिज चौधरी यांच्याकडे रुग्ण येतात. गेली १५ वर्षे ते पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रिया करत असून अनेक खासगी रुग्णालयात आतापर्यंत त्यांनी आपली सेवा प्रदान केली आहे. डॉ. चौधरी यांनी या विषयावर मिळविलेल्या हुकुमतीमुळे आज त्यांचे नाव या विषयातील तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय क्षेत्रात आवर्जून घेतले जाते. पाठदुखी आणि सायटिका या अत्यंत सामान्यपणे आढळणाऱ्या आरोग्य समस्या आहेत. पाठीच्या कण्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी अनेक जण डॉ. चौधरी यांचे मत घेण्यासाठी मुंबईत येत असतात. हार्वर्ड मेडिकल स्कूल येथून स्पाईन सर्जरी या विषयातील फेलोशिपही, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण केईएम रुग्णालयातून त्यांनी पूर्ण केले. 
मत देण्यासाठी येथे क्लिक करा

Web Title: Lokmat Maharashtrian of the Year 2023 Which doctor in Mumbai do you think is the best Check out the nominations and vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.