Lokmat Maharashtrian of the year awards 2024: आज राजधानी मुंबईत महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स सोहळा पार पडला. या सोहळ्यात भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महामुलाखत' लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आणि संपादक अतुल कुलकर्णी यांनी घेतली. यावेळी त्यांना गेल्या काही दिवसांपासून पक्षात होणाऱ्या इनकमींगबाबत प्रश्न विचारण्यात आला.
'थोडं श्रेय राहुल गांधींना...'
यावेळी विजय दर्डा यांनी फडणीसांना विचारले की, गेल्या वर्षी अभिनेते नाना पाटेकरांनी तुमची याच मंचावर मुलाखत घेतली होती. तेव्हा त्यांनी विचारले होते की, मतदाराला काही किंमत आहे की नाही? तेव्हा तुमच्यासोबत फक्त एकनाथ शिंदे होते, आजकाल अनेक पक्षाचे नेते येत आहेत. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, याचे सर्व श्रेय पंतप्रधान मोदीजींनी केलेल्या कामाला आणि थोडे श्रेय राहुल गांधींच्या लीडरशीपला दिले पाहिजे.
'...संधी फक्त भाजपात'
राजकारणात काम करताना प्रत्येकला वाटते की, त्यांना राजकारणात काहीतरी परिवर्तन घडवायचे आहे, पण जर आपले नेतृत्वंच असे असेल, ज्याला लोकंही विसरत आहेत, तेव्हा बऱ्याच अडचणी निर्माण होतात. तीच परिस्थिती काँग्रेसची आणि शरद पवारांच्या पक्षाची झाली आहे. अनेकांना वाटतंय की, आता काम करण्याची संधी फक्त भाजपात आहे, त्यामुळे ते सगळे आमच्याकडे येत आहेत.
मराठा समाजाला आरक्षण देणार, OBC समाजावर अन्याय होऊ देणार नाही- देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसांना पुढे विचारण्यात आले की, पुढच्यावेळी तुमच्या पक्षात कोण अॅड होईल? यावर फडणवीस म्हणतात, मी मागेही पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, आगे आगे देखीये होता है क्या. बरेच चांगले लोकं आमच्या संपर्कात आहेत, भाजपात येण्याची त्यांची इच्छा आहे. ज्यांच्यासोबत व्हेवलेंत जुळेल, त्यांना आम्ही सोबत घेऊ.
भाजपाच्या मतदारांना हा बदल पचेल का?यावर फडणवीस म्हणतात, भाजपने आपले स्वत्व सोडले तर मतदारांना आवडणार नाही. पण, आज वेगवेगळ्य पक्षाचे लोकं आमच्यासोबत येऊन जय श्रीराम, भारत माता की जय म्हणत आहेत. त्यामुळे मतदारांना हे नक्कीच पेटल. ज्या लोकांनी तेव्हा आमच्या हिंदुत्वाला विरोध केला, तेच लोक आज आमचे हिंदुत्व स्वीकारत असली, तर आमच्या मतदाराला नक्कीच त्याचा आनंद होईल, अशी स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी दिली.