Lokmat Maharashtrian Of The Year 2018: 'लोकमत'तर्फे महाराष्ट्रातील कर्तृत्ववानांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 05:07 PM2018-04-10T17:07:48+5:302018-04-10T21:57:47+5:30

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर पुरस्कार सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

Lokmat Maharashtrian Of The Year 2018 Award Ceremony live updates | Lokmat Maharashtrian Of The Year 2018: 'लोकमत'तर्फे महाराष्ट्रातील कर्तृत्ववानांचा सन्मान

Lokmat Maharashtrian Of The Year 2018: 'लोकमत'तर्फे महाराष्ट्रातील कर्तृत्ववानांचा सन्मान

googlenewsNext

मुंबई: महाराष्ट्राच्या हितासाठी झटणाऱ्या, राज्याचं नाव देशातच नव्हे तर जगात मोठं करणाऱ्या, समाजासाठी सर्वस्व वेचणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा आज लोकमत समूहाच्या वतीने 'महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कारांचं हे पाचवं वर्ष होतं. महालक्ष्मी येथील एनएससीआय डोममधील दिमाखदार सोहळ्यात विजेत्यांचा गौरव करण्यात आला. संजय राऊत यांच्या  'रोखठोक' प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली चाणाक्ष उत्तरं, हे या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं.  

बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार अक्षय कुमार, करिना कपूर, राजकारणातले दिग्गज नेते पीयूष गोयल, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, पूनम महाजन, रामदास आठवले, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह उद्योग, समाजकारण, क्रीडा या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा चांगलाच रंगला.

* सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

* सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी सोहळ्याला उपस्थित

* विविध क्षेत्रांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या रत्नांचा होणार सन्मान

* शानदार नृत्याविष्कारानं 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर २०१८' पुरस्कार सोहळ्याला सुरुवात

* राजकारण, उद्योग, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज सोहळ्याला उपस्थित

* सोहळ्याला अन्न आणि नागरी पुरवठा गिरीश बापट, गृहराज्यमंत्री राम शिंदे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित

* लोकमतच्या मंचावर 'फर्जन' चित्रपटाची टीम; फर्जन चित्रपटाच्या टीमचा नृत्याविष्कार. १ जूनला प्रदर्शित होणार चित्रपट.

* आपल्या खुमासदार शैलीत अमृता खानविलकरकडून सोहळ्याचं सूत्रसंचालन

* डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी दिली निवड प्रक्रियेची माहिती

* अनन्या नाटकातील भूमिकेसाठी ऋतुजा बागवेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

* रंगभूमी पुरुष या गटातील पुरस्कार चंद्रकांत कुलकर्णी यांना प्रदान, ट्रायोलॉजी या प्रयोगासाठी सन्मान

* बुद्धिबळपटू आकांक्षा हगवणेचा क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी गौरव; आकांक्षाच्या वतीनं तिच्या आईनं स्वीकारला पुरस्कार

* नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले आयपीएस अधिकारी अभिनव देशमुख यांचा सन्मान; देशमुख यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला पुरस्कार

* सर्वोत्तम प्रशासकीय अधिकारी विभागात जी. श्रीकांत यांना पुरस्कार.

* लंडन महाराष्ट्र मंडळाला ग्लोबल टॉर्च बेअरर पुरस्कार; समीर धर्माधिकारी यांच्या हस्ते गौरव

* चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारानं सुमीत राघवनचा सन्मान

* मराठी चित्रपटसृष्टीत अमीट ठसा उमटवणाऱ्या सुमित्रा भावे यांचा गौरव 

* ईएनटी तज्ज्ञ डॉ. मिलिंद कीर्तने ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'चे मानकरी

* समाजसेवा क्षेत्रातील योगदानासाठी दिनकर कांबळे आणि शांतिलाल मुथ्था यांचा गौरव

* लोकमतचे समूहाच्या संपादकीय बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केलं मनोगत; लोकमतच्या वाटचालीचा घेतला आढावा

* कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन

* भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विशेष पुरस्कार

* रवी शास्त्री यांनी मराठीत मानले लोकमतचे आभार

* क्रीडा पत्रकार अयाझ मेमन यांनी घेतली रवी शास्त्री यांची मुलाखत

* अभिनेत्री करीना कपूर ठरली लोकमत 'पॉवर आयकॉन' पुरस्काराची मानकरी

* खून से पंजाबी हू, लेकीन दिल से महाराष्ट्रीयन हू- करिना कपूर

* आई झाल्यानंतर हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्याचं महत्त्व जास्त- करिना कपूर

* महाराष्ट्रातील लोक कुटुंबवत्सल आणि भावनिक- करिना कपूर

* रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा महाराष्ट्रभूषण पुरस्कारानं गौरव

* अक्षय कुमार, रवी शास्त्री आणि मी एकाच शाळेचे विद्यार्थी- पियुष गोयल

* 'आवाजाची राणी' श्रेया घोषालला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' सन्मान

* लोकमत प्रॉमिसिंग पॉलिटिशनचा पुरस्कार खासदार पूनम महाजन यांना प्रदान

* प्रभावशाली नेता हा पुरस्कार राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्र्यांकडून प्रदान

* पंकजा मुंडे यांनी घेतली धनंजय मुंडे यांची गळाभेट

Web Title: Lokmat Maharashtrian Of The Year 2018 Award Ceremony live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.