आयएअर टेक्नॉलॉजीजमध्ये लोकमत मीडियाची महत्त्वपूर्ण गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 03:23 AM2020-02-04T03:23:17+5:302020-02-04T03:24:26+5:30

स्मार्ट टीव्हीसह अनेक उत्पादने; वितरणाचे जाळे वाढविणार

Lokmat Media's significant investment in IAR technologies | आयएअर टेक्नॉलॉजीजमध्ये लोकमत मीडियाची महत्त्वपूर्ण गुंतवणूक

आयएअर टेक्नॉलॉजीजमध्ये लोकमत मीडियाची महत्त्वपूर्ण गुंतवणूक

Next

मुंबई : आयएअर टेक्नॉलॉजीज या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक स्टार्टअपमध्ये लोकमत मीडियाने महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली आहे. आयएअर कंपनी २४ इंचापासून ते ७५ इंचापर्यंत आकाराचे स्मार्ट टीव्ही, मोबाइल फोन, मोबाइलशी निगडीत अन्य वस्तूंचे उत्पादन करते. लोकमत मीडियाच्या गुंतवणुकीमुळे आयएअर टेक्नॉलॉजीजच्या भागभांडवलात वाढ झाली आहे. आयएअरला त्यामुळे उत्पादनांच्या वितरणाचे जाळे वाढविण्यासाठी व नवी उत्पादने विकसित करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

आयएअर टेक्नॉलॉजीजमधील गुंतवणुकीबाबत लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक व एडिटोरियल डायरेक्टर ऋषी दर्डा यांनी सांगितले की, स्मार्ट टीव्हीच्या उत्पादन व विक्री क्षेत्रात आणखी मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे विविध वाहिन्यांचे चांगल्या प्रकारे वितरण, ग्रामीण व शहरी भागातील वाढत्या अपेक्षांना कवेत घेणे, विविध प्लॅटफॉर्म्सवरील डिजिटल कन्टेन्टच्या प्रेक्षकवर्गात वाढ होणे या गोष्टींनाही चालना मिळेल.

आयएअर टेक्नॉलॉजीजचे संस्थापक व सीईओ रविंदर जोहर हे यशस्वी उद्योजक आहेत. राष्ट्रीय स्तरावर नावाजले जाणारे उत्पादन निर्माण करण्यासाठी रविंदर जोहर यांच्या प्रकल्पात गुंतवणूक करताना लोकमत मीडियाला आनंद होत आहे. रविंदर जोहर म्हणाले की, लोकमत मीडिया ग्रुप हा आयएअर टेक्नॉलॉजीजमध्ये गुंतवणूक करण्याबरोबरच उत्पादनांच्या विक्री व ब्रँड बिल्डिंगसाठी मोलाचे मार्गदर्शन करेल. या सहकार्यातून आम्ही अत्यंत दर्जेदार उत्पादने बनवून ती बाजारपेठेत आणू. या वस्तूंच्या विक्रीनंतरची उत्तम सेवाही ग्राहकांना देऊ. ग्राहकांच्या खिशाला परवडणाºया किंमतीत उत्पादने उपलब्ध करून देण्याचा आमचा विचार आहे.

लोकमत व आयएअरची वैशिष्ट्ये

लोकमत मीडिया समुह ब्रॉडकास्टिंग, पब्लिशिंग, डिजिटल, मनोरंजन, ब्रँड सोल्युशन्स अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. लोकमत मीडियातर्फे प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांचे २.३ कोटी वाचक आहेत. न्यूज १८-लोकमत वृत्तवाहिनी दरमहा पाहणाऱ्यांची संख्या ३ कोटी आहे. या कंपनीतर्फे डिजिटल माध्यमात संचालित सेवांचे २.५ कोटी वापरकर्ते आहेत. लोकमत मीडियातर्फे लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर, लोकमत मोस्ट स्टायलीश, लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड्स, दी वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल, लोकमत वुमन समिट, लोकमत पार्लमेंटरियन अ‍ॅवॉर्ड्स असे अतिशय महत्त्वाचे उपक्रम चालविले जातात.

आयएअर टेक्नॉलॉजीज कंपनी स्वत: निर्माण केलेल्या उत्पादनांची ऑनलाइन व ऑफलाइन विक्री करते. कंपनीच्या उत्पादनांची १०० वितरकांद्वारे देशातील बहुसंख्य राज्यांत विक्री केली जाते. या उत्पादनांना ग्राहकांकडूनही चांगली मागणी आहे. आयएअर टेक्नॉलॉजीजने आपल्या उत्पादनांच्या वितरणाचे जाळे मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सर्व महत्त्वाच्या दुकानांत, बाजारपेठांत आयएअर टेक्नॉलॉजीजची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

Read in English

Web Title: Lokmat Media's significant investment in IAR technologies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.