Lokmat Most Stylish Award 2018 : कर्तव्यदक्ष प्रवीण परदेशी ठरले 'स्टायलिश' प्रशासकीय अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 12:32 PM2018-12-20T12:32:31+5:302018-12-20T12:33:08+5:30
देधडक निर्णय घेणारे, दूरदर्शी आणि अभ्यासू प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रवीण परदेशी ओळखले जातात. लातूर भूकंपादरम्यान त्यांनी केलेल्या कामाचं राज्यांतच नव्हे तर देशात भरभरून कौतुक झालं होतं.
मुंबईः लातूर भूकंपादरम्यान 'ऑन ड्युटी २४ तास' राहिलेले कर्तव्यदक्ष अधिकारी आणि सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून सक्षमपणे काम पाहणारे आयएएस अधिकारी प्रवीण परदेशी यांना 'लोकमत'तर्फे मोस्ट स्टायलिश प्रशासकीय अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आलं. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आज 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड'चा शानदार सोहळा रंगला. या सोहळ्यात सिनेमा, संगीत, फॅशन, राजकारण, शिक्षण क्षेत्रातील स्टायलिश व्यक्तिमत्वांना गौरवण्यात आलं.
२०१४ मध्ये मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपले प्रधान सचिव म्हणून प्रवीण परदेशी यांची नियुक्ती केली. आता ते मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. देधडक निर्णय घेणारे, दूरदर्शी आणि अभ्यासू प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रवीण परदेशी ओळखले जातात. लातूर भूकंपादरम्यान त्यांनी केलेल्या कामाचं राज्यांतच नव्हे तर देशात भरभरून कौतुक झालं होतं. या शाबासकीनं त्यांना नवं बळ मिळालं होतं. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला आहे, प्रत्येक जबाबदारी अगदी समर्थपणे पार पाडली आहे. परदेशी यांचा वनांचा दांडगा अभ्यास असून जंगलं जगली पाहिजेत, प्राण्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालंच पाहिजे, याबाबत ते आग्रही आहेत. त्यांच्या या संवेदनशीलतेला, कर्तव्यदक्षतेला लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डमध्ये दाद देण्यात आली.