मुंबई : नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘लोकमत आपल्या दारी’ हे व्यासपीठ नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. रविवार १२ जून रोजी सकाळी १०.३० वाजता सरदार प्रतापसिंग संकुल, कॉसमॉस शाळेसमोर, भांडुप (प.) येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.येथील सरदार प्रतापसिंग संकुलातर्फे ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ‘लोकमत’च्या माध्यमातून येथील समस्यांवर प्रकाशझोत टाकला जाणार आहे. संकुल परिसरात असलेला फोरजी टॉवर ‘लोकमत’ने केलेल्या सततच्या पाठपुुराव्यामुळे काढून टाकण्यात आला. यासोबतच संकुलातील रहिवाशांना अनेक समस्यांना रोज सामोरे जावे लागत आहे. रस्ते, अनधिकृत दुकाने, स्ट्रीट लाइट, पाणी आणि अशा कैक समस्यांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या ‘लोकमत’च्या माध्यमातून सुटतील, असा विश्वास येथील नागरिकांना वाटत आहे. यातून अनेक नागरी समस्यांवर तोडगा निघेल, असा विश्वास संकुलाचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच या उपक्रमाचे संकुल परिसरात आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान, या कार्यक्रमाला आमदार अशोक पाटील आणि नगरसेवक रूपेश वायंगणकर उपस्थित राहणार आहेत. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजर राहून भेडसावणाऱ्या समस्यांचा ऊहापोह करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत आपल्या दारी’ आज भांडुपमध्ये
By admin | Published: June 12, 2016 4:57 AM