मुंबई - महायुतीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 72 हजार पदांची मेगा भरती करण्याची घोषणा केली होती. शासनाच्या सर्वच विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यासाठी महापरीक्षा पोर्टल या संस्थेकडे काम देण्यात आले होते. या संस्थेने भरती प्रक्रियेत कमालीचा गोंधळ केल्याच्या तक्रारी गत वर्षभरात झाल्या आहेत. त्यानंतर, ही भरतीप्रकिया रखडली. मात्र, ठाकरे सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी आम्ही ही मेगा भरती करणार असल्याचं सांगितलंय.
Exclusive: नागपूर जिल्हा परिषद का गमावली?; फडणवीसांनी सांगितलं राज'कारण'
लोकमत सरपंच अवार्ड कार्यक्रमात एका सरपंच महिलेच्या प्रश्नावर उत्तर देताना, फडणवीस यांची राहिलेली मेगा भरती करणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. ग्रामसेवक पदांच्या कमतरतेविषयी बोलताना, राज्यातील शासकीय पदांची निर्मिती करून मेगा भरती करणार असल्याचं उत्तर मुश्रीफ यांनी फडणवीसांसमोरच दिलं. गावच्या विकासकामात गावचा सचिव म्हणून ग्रामसेवक काम करतात. मात्र, एका गावात एक ग्रामसेवक न देता, अनेक गावात मिळून एक ग्रामसेवक दिला जातो. पण, ज्याप्रमाणे गावात सरपंच महत्वाचे आहेत, तसेच ग्रामसेवकही महत्वाचे आहेत. त्यामुळे, एक गाव एक ग्रामसेवक असं करता येणार नाही का? असा प्रश्न एका गावच्या सरपंचाने विचारला होता. लोकमत सरपंच अवार्ड सोहळ्यातील या प्रश्नावर उत्तर देताना, ''हसन मुश्रिफ यांनी, सध्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, मी पदभार स्वीकारून 4 ते 5 दिवसच झालेत. पण, फडणवीसांची राहिलेली मेगाभरती आम्ही करू, असे म्हणत सकारात्मक उत्तर दिलं.''
Exclusive: ...अन् अखेर स्वत: देवेंद्र फडणवीसांनीच सांगितली मनसेबाबत 'राज की बात'
दरम्यान, याच सोहळ्यात सोहळ्यात विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत स्पष्टपणे उत्तर दिलं. त्यावर, कामगारमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. गुपचूप काहीही केलं तर त्यातून वाईटच घडतं, असे मलिक यांनी म्हटले. मलिक यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात हशा पिकला.
Exclusive : ... तर सगळं वाईटच होतं, राज ठाकरेंच्या भेटीवरुन नवाबांचा फडणवीसांना टोला
राज ठाकरेंसोबत बैठक झाली का? याबद्दल बोलताना आमच्यात अनेकवेळा भेटा झाल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. पण, मनसे आणि भाजपा एकत्र येण्याचे आजतरी कुठलिही चिन्ह नाहीत. मनसेच्या आणि आमच्या विचारात अंतर आहे. मनसेचे विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात आम्ही विचार करू, पण आजतरी ही शक्यता वाटत नाही, असे म्हणत फडणवीस यांनी मनसेसोबतच्या आघाडीच्या प्रश्नावर स्पष्टपणे उत्तर दिलं. त्यावरुन नवाब मलिक यांनी फडणवीसांना टोला लगावला.