Join us  

लोकमतचे करण दर्डा यांची एबीसीच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 6:04 AM

ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन्स ऑफ इंडिया ही सर्क्युलेशन व ऑडिटिंग संस्था आहे. ती देशातील वृत्तपत्रे, मासिकांसह प्रमुख प्रकाशनांच्या सर्क्युलेशनना सर्टिफाय व ऑडिटही करते.

मुंबई : लोकमत मिडिया प्रा. लि.चे कार्यकारी संचालक व संपादकीय संचालक करण दर्डा यांची ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन्सच्या (एबीसी) व्यवस्थापन परिषदेवर २०२२-२३ या वर्षासाठी सदस्यपदी एकमताने निवड झाली आहे. दर्डा हे प्रकाशकांचे प्रतिनिधित्व करतात. 

ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन्स ऑफ इंडिया ही सर्क्युलेशन व ऑडिटिंग संस्था आहे. ती देशातील वृत्तपत्रे, मासिकांसह प्रमुख प्रकाशनांच्या सर्क्युलेशनना सर्टिफाय व ऑडिटही करते. ब्यूरोच्या व्यवस्थापन परिषदेवरील इतर प्रकाशकांच्या प्रतिनिधींमध्ये सकाळ पेपर्स प्रा. लि. चे प्रताप. जी. पवार (अध्यक्ष), मल्याळा मनोरमा कं. लि.चे रियाद मॅथ्यू (मानद सचिव), बॉम्बे समाचार प्रा. लि.चे होरमुसजी एन. कामा, जागरण प्रकाशन लि.चे शैलेश गुप्ता, एचटी मीडिया लि.चे प्रवीण सोमेश्वर, बेनेट कोलमन अँड कं. लि. चे मोहित जैन व एबीपी प्रा. लि.चे ध्रुव मुखर्जी यांचा समावेश आहे. 

जाहिरात एजन्सीचे प्रतिनिधी पुढीलप्रमाणे : आरके स्वामी प्रा. लि.चे श्रीनिवासन के. स्वामी (उपाध्यक्ष), मेडिसन कम्युनिकेशन्स प्रा. लि.चे विक्रम सखुजा (मानद खजिनदार), आयपीजी मीडिया ब्रँड्स, मीडिया ब्रँड्स प्रा. लि.चे शशिधर सिन्हा व ग्रुप एम मीडिया इंडिया प्रा. लि.चे प्रशांत कुमार. जाहिरातदारांच्या प्रतिनिधींमध्ये युनायटेड ब्रेवरीज लि.चे देवव्रत मुखर्जी, आयटीसी लि.चे करुणेश बजाज, टीव्हीएस मोटार कंपनी लि.चे अनिरुद्ध हलदर व मारुती सुझुकी इंडिया लि.चे शशांक श्रीवास्तव यांचा समावेश आहे. होर्मुझद मसानी यांची एबीसी सचिवालयाच्या महासचिवपदी निवड झाली आहे.