'नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं' लोकमतचे महारक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:06 AM2021-07-11T04:06:08+5:302021-07-11T04:06:08+5:30

मुंबई : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन ...

Lokmat's Maharaktadan Shibir of 'Relationship of blood, relationship of intimacy' | 'नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं' लोकमतचे महारक्तदान शिबिर

'नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं' लोकमतचे महारक्तदान शिबिर

Next

मुंबई : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमतच्या वतीने 'नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं' या मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराला महामुंबई परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. येत्या काळात रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाला उपचारात अडचण येऊ नये यासाठी राज्याकडे जास्तीत जास्त रक्तसाठा असणे गरजेचे आहे. यासाठी या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

रक्तदान शिबिराची ठिकाणे तारीख /उपनगर/ सहयोगी संस्था / पत्ता / वेळ

११ जुलै - सानपाडा : विजय नाहटा (शिवसेना नवी मुंबई) / चंदन बँक्वेट हॉल, पाम बीच मार्ग सानपाडा नवी मुंबई / १० ते ४

११ जुलै - कळंबोली : रामदास शेवाळे प्रतिष्ठान (कळंबोली- पनवेल- शिवसेना) / सुधागड स्कूल कळंबोली / ९ ते ४

११ जुलै - ठाणे पश्चिम : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ओवळा माजिवडा विधानसभा / आर. जे. ठाकूर कॉलेज लोकमान्य नगर ठाणे पश्चिम /१० ते ४

११ जुलै - डोंबिवली पूर्व : राजेश मोरे (शिवसेना शहर प्रमुख डोंबिवली) / शिवसेना मध्यवर्ती शाखा डोंबिवली पूर्व / १० ते ४

११ जुलै - भांडुप पश्चिम : राजन दादा गावडे आणि मित्रपरिवार रॉयल महाराष्ट्र युथ फाउंडेशन / गणेश नगर गणेश मंदिराजवळ नवरंग स्टोर भांडुप पश्चिम / ९ ते ४

११ जुलै - मुलुंड पूर्व : चेतन साळवी अध्यक्ष मुलुंड जिमखाना / मुलुंड जिमखाना नवघर रोड, शहानी कॉलनी समोर दीनदयाळ नगर मुलुंड पूर्व / ८ ते ४

११ जुलै - घाटकोपर पूर्व : गंधकुटी संकल्प समिती / गंध कुटीर विहार माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व / १० ते ४

११ जुलै - बोरिवली पूर्व : संजय मोदी, हेल्पिंग हँड्स अँड असोसिएशन विथ समर्पण ब्लड बँक / इम्प्रिंट कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंट जॉन हायस्कूल समोर, सिद्धार्थनगर लेन, पश्चिम दृतगती महामार्ग, बोरवली पूर्व / १० ते ४

११ जुलै - दादर पूर्व : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन / संत निरंकारी सत्संग भवन, ५० मोरबाग रोड, नायगाव दादर पूर्व / ९ ते १

११ जुलै - गिरगाव : श्रीकांत तेंडुलकर अध्यक्ष, संजय हरमळकर सचिव, गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळ / सारस्वत समाज हॉल, गिरगाव / १० ते ४

११ जुलै - बोरिवली पश्चिम : आम्ही मावळे / प्रगती स्कूल गोराई, बोरिवली पश्चिम / ९ ते ४

११ जुलै - अंधेरी पश्चिम : रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट / वाय एम सी ए न्यू लिंक रोड पोस्ट ऑफिस समोर मधुबन कॉलनी, डी एन नगर अंधेरी पश्चिम / ८:३० ते ३

११ जुलै - जुहू : रोटरॅक्ट क्लब ऑफ मुंबई जेवेल्स / राऊत गल्ली जुहू तारा, जुहू / १० ते २

११ जुलै - मालाड पूर्व : रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ वेस्ट मालाड, रोटरॅक्ट क्लब ऑफ दहिसर कोस्ट, रोटरॅक्ट क्लब ऑफ घनश्यामदास सराफ कॉलेज / नवजीवन ज्युनिअर कॉलेज, मालाड मतनपूर नगर मालाड पूर्व / ११ ते ४

११ जुलै - नालासोपारा पूर्व : नीलेश देशमुख, माजी सभापती, ड प्रभाग, वसई-विरार महापालिका, बहुजन विकास आघाडी / के एम पी डी स्कूल, तुळींज रोड, नालासोपारा पूर्व / ९ ते ५

११ जुलै - नालासोपारा पश्चिम : प्रवीण उमरकर, युवा अध्यक्ष, वॉर्ड क्रमांक ५५, बहुजन विकास आघाडी / मदर मेरी स्कूल, शांती पार्क, श्रीप्रस्थ, दुसरा रोड, नालासोपारा पश्चिम / ९ ते ५

११ जुलै - ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (ओवळा माजिवडा विधानसभा) ठाणे / रा.ज ठाकूर विद्या मंदिर हॉल, लोकमान्य नगर, पाडा नंबर, ठाणे पश्चिम / १० ते ४

११ जुलै - डोंबिवली : खासदार श्रीकांत शिंदे आणि राजेश गोवर्धन मोरे, शिवसेना मध्यवर्ती शहर शाखा डोंबिवली (शहर प्रमुख) / शिवसेना मध्यवर्ती शहर शाखा, डोंबिवली पूर्व / ९.३० ते ५

११ जुलै - बोरिवली पश्चिम : भारतीय जनता पक्ष आणि बोरिवली दैवज्ञ समाज आयोजित भव्य रक्तदान शिबिर, उद्घाटक - गोपाळ शेट्टी (खासदार उत्तर मुंबई), प्रमुख उपस्थिती सुनील राणे (आमदार बोरिवली विधानसभा) / साईली कॉलेज, एम.एच.बी. कॉलनी, गोराई रोड, बोरिवली पश्चिम / १० ते २

११ जुलै - गोरेगाव पश्चिम : नीलेश भोसले, चेअरमन हॅंडस ॲाफ ॲक्शन / मीनाताई ठाकरे रक्तपेढी, आरे रोड, गोरेगाव पश्चिम / १०:३०

येथे संपर्क साधा

'लोकमत'च्या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, आदी मुंबई महानगर प्रदेशात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी रोनाल्ड डिसोझा यांना ९०८२९९६५८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

या संकेतस्थळावर नोंदणी करा

http://bit.ly/lokmatblooddonation

Web Title: Lokmat's Maharaktadan Shibir of 'Relationship of blood, relationship of intimacy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.