Join us

उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 

By मनीषा म्हात्रे | Published: April 27, 2024 5:29 AM

चार गुन्हे दाखल, उत्तर पूर्व मुंबईचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे

मुंबई : उत्तर पूर्व मुंबईत आचारसंहिता जारी केल्यापासून ९३ लाख ३७ हजारांची रोकड मुलुंड, घाटकोपर आणि मानखुर्द भागातून जप्त केली आहे. याप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उत्तर पूर्व मुंबईचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत ५९८३ बॅनर्स कर्मचाऱ्यांनी हटवत कारवाई केली आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी ४४ तक्रारी आल्या. यामध्ये सर्वाधिक तक्रारी उमेदवार नाव, चीन्ह तसेच भिंतीवर लावलेल्या पोस्टर संबंधित होत्या. 

त्यापाठोपाठ मुलुंडमधून १६ लाख ९८ हजार, घाटकोपर मधून ७२ लाख ३९ हजार ६७५ आणि मानखुर्द मधून अडीच आणि दीड लाखांची अशी एकूण ९३ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 

कपबशीवर कमळ अन् कारवाई

भांडुप मध्ये कमळचे चिन्ह असलेल्या कपबशीचे वाटप केल्याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करत भांडुप पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करत पोलीस तपास करत आहे.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४मुंबई उत्तर पूर्वमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४